ठाकरेंचा कट्टर शिवसैनिकाचा शिंदे गटात प्रवेश, ठाकरेंचा “तो” नगरसेवक देखील जाणार ?

वसंत पाटील हे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या जवळचे पदाधिकारी आहेत, याशिवाय डेमसे यांचे विश्वासू म्हणून ओळख आहे.

ठाकरेंचा कट्टर शिवसैनिकाचा शिंदे गटात प्रवेश, ठाकरेंचा तो नगरसेवक देखील जाणार ?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 01, 2022 | 4:02 PM

नाशिक : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले आहेत. परंतु नाशिकमधील आमदार आणि खासदार शिंदे गटात गेलेले असतांना मोठे पदाधिकारी कुणीही ठाकरेंना सोडून गेलेले नाहीत. त्यातच ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने शिंदे गटात प्रवेश केल्याने आता नगरसेवक देखील ठाकरेंना सोडून शिंदे गटात येतील अशी चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नाशिकच्या इंदिरानगर आणि पाथर्डी परिसरातील कट्टर ठाकरे समर्थक अशी ओळख असलेल्या सेनेचे माजी पदाधिकारी वसंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात रविवारी अधिकृत प्रवेश केला. शिंदे गटाचे महानगरप्रमुख बंटी तिदमे आणि जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी हा प्रवेश घडवून आणला आहे. माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांनी हा प्रवेश घडवून आणला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेल्या वसंत पाटील यांची नाशिकमधील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे.

वसंत पाटील हे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या जवळचे पदाधिकारी होते, याशिवाय डेमसे यांचे विश्वासू म्हणून ओळख आहे.

वसंत पाटील यांनी दोनदा महानगरपालिकेची निवडणूक लढवली आहे, 2007 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर तर 2017 ला अपक्ष निवडणूक लढवली होती.

2007 मध्ये प्रभाग क्रमांक 101 मधून पाटील यांचा पराभव झाला होता, त्यावेळी अपक्ष संजय नवले हे विजयी झाले होते.

तर 2012 ला पाटील यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी निवडणूक लढवली नव्हती तर 2017 ला त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत सेनेच्या उमेदवारला पाडले होते.

2017 ला त्यांनी स्वतः निवडणूक न लढवता, त्यांच्या कन्या शुक्रवंती यांना उभे करून सेनेच्या जयश्री जाधव यांचा पराभव करण्यास महत्वाची भूमिका घेतली होती.

एकूणच वसंत पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात दिसणार असले तरी त्यांचे जवळचे असलेले डेमसे यांनी ही चाल तर खेळली नाही ना ? अशी चर्चा नाशिकच्या पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रभाग 31 मधील उमेदवार हा खांदेश पट्ट्यातील असल्यास निवडून येण्याची शक्यता अधिक असते, त्यात पाटील हे खांदेश पट्ट्यातील असल्याने डेमसे यांचाही शिंदे गटात जाण्याचा विचार असावा अशी शंका घेण्यास वाव आहे.