AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hasan Mushrif: आता तुमची लुडबुड… राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांचा थेट इशारा, संजय राऊतांसह विरोधकांना काय सुनावले?

Hasan Mushrif on Sanjay Raut: अजितदादांच्या राष्ट्रवादीतील काही घाडमोडी, शपथविधी घाई या मुद्दावर सर्वच पक्षातील नेत्यांनी त्यांची बाजू मांडली. काहींनी नाराजी व्यक्त केली. तर विलीनीकरणाबाबतही अजितदादांच्या पक्षातील काही बडे नेते खोडा घालत असल्याचा सूर उमटत आहेत. त्याचवेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा इशारा दिला आहे.

Hasan Mushrif: आता तुमची लुडबुड... राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांचा थेट इशारा, संजय राऊतांसह विरोधकांना काय सुनावले?
हसन मुश्रीफ, अजितदादा पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 07, 2026 | 10:00 AM
Share

Hasan Mushrif on NCP : अजितदादांच्या अकाली एक्झिटने अनेकांना धक्का बसला. राष्ट्रवादी पक्षाचं अपरिमित नुकसान झालं. तरीही चौथ्या दिवशी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. घरात दु:खाचे सावट असताना घाई घाईत घेतलेल्या शपथविधीवरून टीका झाली. संशय व्यक्त झाला, नाराजीही व्यक्त झाली. इतर पक्षातील अनेक नेत्यांनी त्यावर भाष्य केले. हा प्रकार अनेकांना रुचला नाही. तर विलीनीकरणाबाबतही अजितदादांच्या पक्षातील काही बडे नेतेच खोडा घालत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यावरून आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा इशारा दिला आहे.

आमचा पक्ष वेगळा, लुडबुड थांबवा

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सकाळीच कोल्हापूरात मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी अनेक विषयावर संवाद साधला. तर राष्ट्रवादी पक्षातील घाडमोडींवर इतर पक्षातील नेते जे भाष्य करत आहेत. त्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी आमचा पक्ष स्वतंत्र आहे. त्यात आता कुणीही लुडबुड करू नये, असा इशारा त्यांनी दिला. आमच्या दु:खाच्या प्रसंगात, आम्ही शोकसागरात बुडालो आहोत. असं असतानाही ही मंडळी आम्हाला का डिवचत आहेत याची मला शंका आहे असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.

मग ते व्हिलन कसे?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेच पक्षाला चालवत असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. तर त्यांच्यामुळे घाईघाईत शपथविधी करण्यात आला. विलीनीकरणातही त्यांचाच खोडा असल्याची टीका इतर पक्षातील नेतेमंडळी वारंवार करत आहेत. त्याकडं मुश्रीफ यांचं माध्यमांनी लक्ष वेधलं असता, त्यांनी याप्रकरणी सडेतोड भूमिका मांडली.

अजितदादांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांना चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. आता मला सांगा, प्रफुल पटेल यांनी अनेक वर्ष शरद पवार यांच्यासोबत काम केलेलं आहे. ते पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत.सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. दादांच्या अचानक जाण्यानं मग पक्षाची बैठक कोणी बोलावायची? विधीमंडळाची बैठक अध्यक्षच बोलवतील ना, सुनील तटकरे यांनी ती बैठक बोलावली. प्रफुल पटेल यांनी ती बोलावली. मग तटकरे आणि पटेल व्हिलन कसे? असा सवाल त्यांनी विचारला. जर त्यांनी बैठक बोलावली आणि सुनेत्रा पवार यांनाच त्यांनी उपमुख्यमंत्री केलं तर ते व्हिलन कसं ठरू शकतात असा उलट प्रश्न त्यांनी केला. तर या दोघांना कोण व्हिलन ठरवू पाहत आहेत , याप्रश्नावर त्यांनी माध्यमांवर चेंडू टोलावला. तर या अपघाताची चौकशी सुरू आहे. अपघाताचा अहवालही लवकरच समोर येईल असे त्यांनी स्पष्ट केले. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत आम्ही नव्हतो असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...