AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शौर्य पुरस्कारांची घोषणा! 78 जणांचा गौरव होणार; 9 जणांना कीर्ती चक्र, 19 जणांना शौर्य चक्र जाहीर

Gallantry Awards 2026 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांना शौर्य पुरस्कार देण्यास मंजुरी दिली आहे.

शौर्य पुरस्कारांची घोषणा! 78 जणांचा गौरव होणार; 9 जणांना कीर्ती चक्र, 19 जणांना शौर्य चक्र जाहीर
Shaurya Award AnnouncementImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 14, 2026 | 10:04 PM
Share

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांना शौर्य पुरस्कार देण्यास मंजुरी दिली आहे. यावेळी 78 शूर वीरांना शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असून, त्यापैकी 13 जणांना हा सन्मान मरणोत्तर प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

यंदा दिल्या जाणाऱ्या 78 पुरस्कारांमध्ये 9 कीर्ती चक्र आणि 19 शौर्य चक्रांचा समावेश आहे. याशिवाय एका जवानाला शौर्य चक्र ‘बार’, पाच जणांना सेना पदक ‘बार’ (शौर्य), 36 जणांना सेना पदक (शौर्य), तीन जणांना नौसेना पदक (शौर्य) आणि पाच जणांना वायुसेना पदक (शौर्य) देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. कीर्ती चक्र मिळणाऱ्यांपैकी सात जणांना हा सन्मान मरणोत्तर प्रदान केला जाणार आहे. कीर्ती चक्र हे अशोक चक्रानंतर शांततेच्या काळात दिले जाणारे भारतातील दुसरे सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे, तर शौर्य चक्र हा शांततेच्या काळातील तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.

9 कीर्ती चक्र विजेत्यांची नावे

कीर्ती चक्र मिळणाऱ्या वीरांमध्ये लष्कराचे लेफ्टनंट कर्नल मानियो फ्रान्सिस, लष्कराचे मेजर जितेंद्र राठी, लष्कराचे हवालदार गजेंद्र सिंह (मरणोत्तर), गृह मंत्रालयाचे हेड कॉन्स्टेबल जगबीर सिंह (मरणोत्तर), कॉन्स्टेबल जसवंत सिंह (मरणोत्तर), कॉन्स्टेबल बलविंदर सिंह (मरणोत्तर), कॉन्स्टेबल तारिक हुसैन (मरणोत्तर), हेड कॉन्स्टेबल बशीर अहमद (मरणोत्तर) आणि इन्स्पेक्टर सुनील कुमार (मरणोत्तर) यांचा समावेश आहे.

मेजर आदित्य प्रताप सिंह यांना शौर्य चक्र ‘बार’

याशिवाय लष्कराच्या राजपुताना रायफल्सचे मेजर आदित्य प्रताप सिंह यांना शौर्य चक्र ‘बार’ने सन्मानित करण्यात येणार आहे. ते सध्या 44 आसाम रायफल्समध्ये तैनात आहेत. त्यांच्या नावासोबत सेना पदकाचाही उल्लेख आहे. यापूर्वी जून 2026 मध्ये भारत-म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात आलेल्या एका धाडसी मोहिमेदरम्यान अद्वितीय शौर्य दाखवल्याबद्दल त्यांना शौर्य चक्र मिळाले होते.

कोणाला मिळणार शौर्य चक्र?

शौर्य चक्राने सन्मानित करण्यात येणाऱ्या 19 रणबांकुरांमध्ये लष्कराचे मेजर परमवीर, मेजर तरुण वासुदेवन, मेजर केशव कुमार, मेजर गौरव सिंह बृजवाल, मेजर विपीन कुमार, नायब सूबेदार शंकर राम, नायब सूबेदार डब्बल सिंह बिष्ट, हवालदार जगत्तर सिंह, लान्स नायक नरेंद्र सिंधु, लान्स नायक कपिल देव, सिपाही जसविंदर सिंह, नौदलाचे लेफ्टनंट कमांडर शिवम कुमार, वायुसेनेचे स्क्वाड्रन लीडर सुधीर कुमार, गृह मंत्रालयाचे धीरज सिंह कटोच, पोलीस उपअधीक्षक अजय सिंह चिब, इन्स्पेक्टर सुखवीर सिंह, पोलीस उपअधीक्षक नियाज अहमद, असिस्टंट सब-इन्स्पेक्टर अंजनी कुमार, डेप्युटी कमांडंट दीपक साह आणि कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.

शौर्य पुरस्कारांची संपूर्ण यादी

  • 9 जणांना कीर्ती चक्र, त्यापैकी 7 जणांना मरणोत्तर सन्मान
  • 1 जणाला शौर्य चक्र ‘बार’
  • 19 जणांना शौर्य चक्र, त्यापैकी 1 जणाला मरणोत्तर सन्मान
  • 36 जणांना सेना पदक (शौर्य), त्यापैकी 5 जणांना मरणोत्तर सन्मान आणि 5 ‘बार’
  • 3 जणांना नौसेना पदक (शौर्य)
  • 5 जणांना वायुसेना पदक (शौर्य)

शौर्य पुरस्कारांमध्ये ‘बार’ या शब्दाचा अर्थ काय?

शौर्य पुरस्कारांमध्ये ‘बार’चा अर्थ असा आहे की, एखाद्या व्यक्तीला यापूर्वी एखाद्या चक्र किंवा पदकाने (उदा. वीर चक्र, महावीर चक्र इत्यादी) सन्मानित करण्यात आले असेल आणि त्यानंतर त्याने पुन्हा त्याच पुरस्कारासाठी पात्र ठरेल असे शौर्यपूर्ण कार्य केले असेल, तर त्याच्या आधीच्या पुरस्काराची पुनरावृत्ती न करता त्या पदकाच्या रिबनवर धातूची एक छोटी पट्टी म्हणजेच ‘बार’ जोडली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या जवानाला शौर्य चक्र मिळाले आणि त्यानंतर त्याने पुन्हा असामान्य शौर्य दाखवले, ज्यामुळे तो पुन्हा शौर्य चक्रासाठी पात्र ठरला, तर त्याला दुसरे शौर्य चक्र देण्याऐवजी मूळ शौर्य चक्रासोबत ‘बार’ प्रदान केला जातो.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...