केंद्रात राफेल आणि राज्यात वाझे, त्यामुळेच कोरोना वाढतोय का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

केंद्रात राफेल आणि राज्यात वाझे, त्यामुळेच कोरोना वाढतोय का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल
प्रकाश आंबेडकर, नेते, वंचित बहुजन आघाडी

दोन्ही सरकार अडचणीत सापडले आहे. म्हणूनच हा कोरोना व्हायरस देश सोडून केवळ महाराष्ट्रातच आलाय की काय, असा प्रश्न पडतोय, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सचिन पाटील

|

Apr 09, 2021 | 7:13 PM

बीड : केंद्रात राफेल घोटाळा (Rafale Deal)  आणि महाराष्ट्रात सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरण, यामुळे दोन्ही सरकार अडचणीत सापडले आहे. म्हणूनच हा कोरोना व्हायरस देश सोडून केवळ महाराष्ट्रातच आलाय की काय, असा प्रश्न पडतोय, अशी मिश्किल टीका वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्यापासून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवा असं आवाहनही प्रकाश आंबडेकर यांनी केले. ते बीडमध्ये बोलत होते. (rafale deal in the center and Sachin Vaze case in Maharashtra, is that why corona cases increasing in maharashtra asks Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरेंनी व्यापाऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी आजची मुदत दिली होती. मात्र अजूनपर्यंत त्यांचं काही स्टेटमेंट आलं नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपले शटर उघडे ठेवून व्यवहार सुरु ठेवावेत. सरकारची आर्थिक परिस्थिती खालावली असेल, तर आम्ही मदत करु पण व्यवहार करु द्या, असं त्यांना सांगितलं पाहिजे”.

केवळ महाराष्ट्रातच कोरोना का?

“देशात राफेल आणि राज्यात सचिन वाझे प्रकरण आहे, त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच कोरना आहे का असा प्रश्न पडतोय”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आजपासून वीकेंड लॉकडाऊन

महाराष्ट्रात आजपासून वीकेंड लॉकडाऊन लागू होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असतील. कोरोनाचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend lockdown) जाहीर करण्यात आला आहे.  महिन्यातील सर्व वीकेंडला हे निर्बंध असतील. याशिवाय रात्री 8 वाजल्यापासून (Maharashtra night curfew) कडक निर्बंध लागू आहेत.

VIDEO : प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या  

Maharashtra Weekend lockdown : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

Maharashtra Weekend lockdown: राज्यात वीकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें