5

Maharashtra Weekend lockdown : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

कोरोनाचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend lockdown) जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळत सर्व बंद राहणार आहे.

Maharashtra Weekend lockdown : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 6:42 PM

मुंबई : कोरोनाचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend lockdown) जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळत सर्व बंद राहणार आहे. महिन्यातील सर्व वीकेंडला हे निर्बंध असतील. याशिवाय उद्या रात्री 8 वाजल्यापासून (Maharashtra night curfew) कडक निर्बंध लागू होतील. वीकेंड लॉकडाऊन असला तरी निर्बंध हे उद्या रात्रीपासूनच लागू होणार आहेत. म्हणजे उद्या रात्रीपासून अत्यावश्यक सोडून सर्व दुकाने रात्री 8 नंतर बंद होतील. महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी असेल.

अत्यावश्यक सोडून सर्व दुकाने रात्री 8 नंतर बंद होतील. सर्व मॉल, बार बंद राहतील, अत्यावश्यक सोडून सर्व दुकाने बंद होतील, अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

वाहतूक व्यवस्था

राज्याक कडक निर्बंध असले तरी वाहतूक व्यवस्था सुरुच राहणार आहे. कोणतीही वाहने बंद होणार नाहीत. मुंबई लोकल सुरु राहणार आहे. बस, रिक्षा, टॅक्सी सुरु राहणार, पण त्यांच्या प्रवासी क्षमतेवर बंधन असेल. रिक्षामध्ये १ आणि दोन पॅसेंजर, म्हणजे ५० टक्के क्षमतेने सर्व वाहने सुरु राहतील.

जिल्हाबंदी नाही

राज्यात वीकेंड लॉकडाऊन जाहीर झाला आहे. शुक्रवारी रात्री 8 पासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन असेल. मात्र जिल्हाबंदी नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. लॉकडाऊन कोणालाच नको होता, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

मास्क न लावल्यास आता 500 रुपये दंड

याबाबत बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ” राज्यात टाळेबंदी नाही, जर लॉकडाऊन होणार असेल तर 3 दिवस आधी सांगण्यात येईल. सध्या वीकेंड लॉकाडऊन आहे. याशिवाय 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत सर्व बंद राहील. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येदेखील काही बदल होतील. मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल”

यापुढे डोळेझाक केलं जाणार नाही, नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. राज्यात शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन राहील, असं भुजबळांनी ठणकावलं.

खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’

खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सक्ती करण्यात आली आहे. केवळ बँक, विमा आणि मेडिक्लेमसारखी कार्यालये सुरु राहतील. याशिवाय सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीत कामं सुरु राहतील.

काय सुरु, काय बंद?

-इंडस्ट्री सुरु राहील -खासगी ऑफीसेसना वर्क फ्रॉम होमच्या सूचना,

–  बँक, विमा आणि मेडिक्लेमसारखी कार्यालये सुरु राहणार -मंत्रालय आणि सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील -कोणतीही वाहने बंद नाहीत, मुंबई लोकल सुरु राहणार, बस, रिक्षा, टॅक्सी सुरु राहणार, पण त्याच्या प्रवासी क्षमतेवर नियंत्रण -रिक्षा १ आणि दोन पॅसेंजर, ५० टक्के क्षमतेने सर्व वाहने -वीकेंडला कडक लॉकडाऊन शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत असेल. यामध्ये कुठलेही राजकीय कार्यक्रम नाही, सर्व धर्मस्थळ बंद -बांधकामं सुरु राहणार -सरकारी विकासकामे सुरुच राहणार – चित्रपट शूटिंगवेळी गर्दी होता कामा नये – बार आणि रेस्टॉरंटवर देखील काही निर्बंध येतील -समारंभ सगळे बंद राहतील कंटमेंट झोनमध्ये अजून कडक निर्बंध – सोसायटीमध्ये घालून दिलेले नियम मोडले तर 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल -धार्मिक स्थळावरदेखील काही बंधने येतील

असा असेल लॉकडाऊन

> उद्या रात्री 8 वाजेपासून नियमावली लागू >> रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी >> मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, डिलिव्हरी सर्व्हिस चालू >> सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं काम करणार >> इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही >> बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार >> भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्णय >> शुटिंगवर गर्दी होणार नाही तिथे परवानगी, चित्रपटगृहे बंद राहणार >> सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, बस, रेल्वे, टॅक्सी बंद राहणार नाहीत, पण त्यांच्यातील प्रवासी क्षमता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क बंधनकारक, क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार (weekend lockdown imposed in maharashtra)

एकमताने चर्चा करुन निर्णय

कडक निर्बंध आणि वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, हॉटेल, चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक यांच्याशी चर्चा केली. शूटिंग सुरु राहतील, मात्र गर्दी होणार असेल, तिथे परवानगी दिली जाणार नाही. सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, क्षमतेच्या 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार, असं मलिक यांनी सांगितलं.

VIDEO : राज्यात वीकेंड लॉकडाऊन 

संबंधित बातम्या :

राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद  

Weekend Lockdown | महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्थेबाबत काय निर्णय?

Maharashtra Lockdown : संपूर्ण महाराष्ट्रात ‘मिनी लॉकडाऊन’, काय बंद, काय सुरु राहणार?

Non Stop LIVE Update
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल