Rahuri Exit Poll 2026 : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत काय होणार? कोण मारणार बाजी? भाजप की राष्ट्रवादी शरद पवार गट?

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या देखील दोन विधानसभा पोटनिवडणुकीचा समावेश आहे. दरम्यान आता या निवडणूक निकालाचे एक्झिट पोल हाती आले आहेत.

Rahuri Exit Poll 2026 : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत काय होणार? कोण मारणार बाजी? भाजप की राष्ट्रवादी शरद पवार गट?
Rahuri Exit Poll 2026
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 29, 2026 | 8:46 PM

आज पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्पाचं मतदान पार पडलं. आसाम, केरळ, तामिळनाडू , आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये आधीच मतदान झालं होतं. यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान झालं आहे. यामध्ये बारामती विधानसभा मतदार संघ आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व विधानसभा निवडणुकांचा निकाल एकत्रितपणे 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. परंतु त्यापूर्वी आज निवडणूक निकालाचे एक्झिट पोल हाती आले आहेत. या एक्झिट पोलनुसार राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हेच विजयी होण्याची शक्यता आहे. त्यांना  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे तसेच वंचित बहुजन आघाडीकडून  संतोष चोळके यांनी कडवं आव्हान दिलं होतं. शेवटी आता एक्झिट पोल हाती आले आहेत.

राहुरी विधानसभा पोट निवडणुकीत काय चित्र? 

रिंगसाईड रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार राहुली विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 1 लाख 42 हजार 500 एवढं मतदान पडण्याची शक्यता आहे. एकूण झालेल्या मतदानाचा विचार केल्यास कर्डिले यांना 76 टक्के मतदान झाल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे  यांना 25  हजार 500 एवढं मतदार होण्याची शक्यता आहे, त्यांना 14 टक्के मत पडू शकतात असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवला आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राहुरी विधानसभा पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे मोठ्या फरकाने विजयी होण्याची शक्यता आहे.

तीन ठिकाणी भाजपच्या विजयाचा अंदाज 

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता विविध संस्थांचे एक्झिट पोल हाती आले आहेत, या सर्व एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तर केरळमध्ये डाव्या पक्षांना यावेळी धक्का बसणार असून, काँग्रेस सत्तेत येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

 

 

 

Follow Us