Raigad : जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना नो एण्ट्री; पुढील तीन महिने समुद्र पर्यटन बंद

Raigad : जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना नो एण्ट्री; पुढील तीन महिने समुद्र पर्यटन बंद

पावसाळ्यात समुद्र पर्यटनातील धोका लक्षात घेता, पुढील तीन महिने रायगडमधील समुद्र पर्यटन पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

अजय देशपांडे

|

May 29, 2022 | 7:44 AM

रायगड : मान्सून (Monsoon) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मान्सून काळात समुद्रात वादळाचा धोका असतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पुढील तीन महिने रायगड जिल्ह्यातील समुद्र पर्यटन (Sea tourism in Raigad district) बंद राहणार आहे. 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान पर्यटन बंद राहणार असल्याची माहिती मेरिटाईम बोर्डाच्या (Maritime Board) वतीने देण्यात आली आहे. मान्सून काळात पर्यटनासाठी समुद्रात गेलेल्या पर्यटकांसोबत अनेक अपघात घडतात. त्यामुळे या कालावधीत जलवाहतूकही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलवाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने जंजिरा किल्ला देखील पुढील तीन महिने पर्यटकांसाठी बंद असणार आहे. अलिबागसह नागाव, काशीद, मुरूड या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा देखील मेरिटाईम बोर्डाच्या वतीने देण्यात आला आहे. पुढील तीन महिने समुद्री पर्यटन बंद असल्याने पावसाळ्यात लोणावळा, खंडाळा आणि माथेरान सारख्या ठिकणी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात समुद्रात धोका

रायगड जिल्ह्यात समुद्र पर्यटनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पर्यटकांसाठी इथ विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बनाना, राईड, बोटिंग, पॅरासेलिंग, जेट्सकी अशा अनेक सुविधा पर्यटकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समुद्र पर्यटनसाठी आलेले पर्यटक धमाला करतात. उन्हाळा आणि हिवाळ्यात समुद्रात जाण्यामध्ये कोणताही धोका नसतो. मात्र पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. वादळाचा धोका असतो. समुद्रात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या जीवाना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 26 मे पासून पुढील तीन महिने पर्यटकांसाठी समुद्री पर्यटन बंद ठेवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

सप्टेंबमध्ये पर्यटनाला पुन्हा सुरुवात

पावसाळ्यात समुद्रात जाणे धोक्याचे ठरू शकते, पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढील तीन महिने समुद्री पर्यटन बंद राहणार आहे. जंजिरा किल्ल्यावर देखील पर्यटकांना जाता येणार नाही. जंजीरा किल्ला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असते, दरवर्षी लाखो लोक या किल्ल्याला भेट देतात. मात्र हा किल्ला समुद्रात असल्याने पुढील तीन महिने किल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तीन महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये पर्यटनाला पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर जंजिरा किल्ल्यावर जायचे असेल तर तीन महिने वाट पहावी लागणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें