Ticket Booking : मुंबईकरांची पेपरलेस तिकीट बुकिंगला पसंती; रेल्वे खिडक्यांसमोरील गर्दी झाली कमी

Ticket Booking : मुंबईकरांची पेपरलेस तिकीट बुकिंगला पसंती; रेल्वे खिडक्यांसमोरील गर्दी झाली कमी
मुंबईकरांची पेपरलेस तिकीट बुकिंगला पसंती
Image Credit source: TV9

युटीएस मोबाईल ॲपद्वारे मुंबई उपनगरीय प्रवासाची तिकिटे तसेच सीझन तिकिटांच्या खरेदीत अलीकडच्या काही महिन्यांत सातत्याने वाढ होत आहे. यासंदर्भातील आकडेवारीचा विचार करता लोकल तिकीट बुकिंगची कॅशलेसच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

May 29, 2022 | 12:51 AM

मुंबई : लोकल प्रवास सुरु करण्याआधी धावत धावत आधी तिकीट खिडकी गाठणाऱ्यांचे प्रमाण आता कमी झाली आहे. तिकीट खिडक्यांसमोरील गर्दी ओसरली आहे. याचं कारण म्हणजे मुंबईकर आता डिजिटल (Digital) आणि पेपरलेस बुकिंग (Paperless Booking)ला अधिक पसंती देऊ लागले आहेत. नियोजित प्रवास सुरु करायचा असेल तर लोक घरातूनच आधी युटीएस (UTS) मोबाइल तिकीट बुकींग करीत आहेत. तिकीट खिडकीसमोर वेळ वाया घालवण्यापेक्षा युटीएस मोबाइल तिकीट काढण्यास प्राधान्य दिले जात आहे. कोरोना महामारीत सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य दिले गेले. त्यामुळे युटीएस मोबाइल तिकिटाकडे मुंबईकरांचा कल वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

डिजिटल यूटीएस मोबाइल तिकीट सुरक्षित, कॅशलेसच्या दिशेने वाटचाल

कोविडनंतर मोठ्या प्रमाणावर प्रवासी डिजिटल यूटीएस मोबाइल तिकीट प्रणालीचा पर्याय निवडत आहेत. नजीकच्या भविष्यात डिजिटल तिकीटिंगचे हे प्रमाण चांगलेच वाढण्याची चिन्हे यातून दिसत आहेत. युटीएस मोबाईल ॲपद्वारे मुंबई उपनगरीय प्रवासाची तिकिटे तसेच सीझन तिकिटांच्या खरेदीत अलीकडच्या काही महिन्यांत सातत्याने वाढ होत आहे. यासंदर्भातील आकडेवारीचा विचार करता लोकल तिकीट बुकिंगची कॅशलेसच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तशी मानसिकता मुंबई रेल्वे प्रवाशांची झाली आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे डिजिटल तिकिटाकडे कल वाढला

कोरोना विषाणूच्या आजारामुळे लोक स्वत:च्या घरात बंदिस्त राहिले. मागील दोन वर्षांपासून जागतिक स्तरावर या महामारीचा मोठा फटका बसला आहे. महामारीने नागरिकांची जीवनशैलीच पूर्णपणे बदलून टाकली आहे. याचवेळी सोशल डिस्टन्सिंग आणि तिकीट खिडकीवरील (बुकिंग ऑफिसमधील) गर्दी कमी करण्याची गरज अधोरेखित झाली. परिणामी, लांब पल्ल्याच्या रेल्वेसह लोकल गाड्यांच्या तिकीट खरेदीसाठी डिजिटल पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात उपनगरीय तिकिटे खरेदी करण्यासाठी युटीएस मोबाइल ॲप प्रवाशांसाठी पुन्हा उघडण्यात आले होते. तेव्हापासून युटीएस मोबाइल ॲपद्वारे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रेल्वे प्रशासनानेही प्रवाशांचा वाढता कल लक्षात घेऊन प्रवाशांसाठी डिजिटल प्रणाली अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. (Mumbaikars prefer digital and paperless ticket booking)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें