AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : सिद्धिविनायक मंदिरातून 180000000 रुपयांची चोरी; राज ठाकरेंच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ

raj thackeray news : राज ठाकरे यांनी देशातील आणखी एका प्रसिद्ध मंदिरात दान चोरी झाल्याचं अधोरेखित केलं. या मंदिराच्या दान पेटीतून 18 कोटी लंपास झाल्याचा दावा केला आहे.

Raj Thackeray : सिद्धिविनायक मंदिरातून 180000000 रुपयांची चोरी; राज ठाकरेंच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ
| Updated on: Aug 01, 2026 | 1:35 PM
Share

देशात अयोध्येतील राम मंदिराच्या देगणी गैरव्यवहारावरून राजकारण तापलेलं असताना आता मुंबईतूनही धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातून कोट्यवधींच्या देणगीची चोरी झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. प्रसिद्ध मंदिरातून कथित दान पेटीतील देणगी चोरीच्या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सिद्धिविनायक मंदिरातून तब्बल 18 कोटींची चोरी झाल्याचा आरोप ठाकरेंनी एका पत्राच्या आधारे केला आहे.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातून हा आरोप केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापनाच्या कार्यक्रमात खळबळजनक आरोप केला. राज ठाकरे म्हणाले, ‘एक पत्र आहे. प्रति एकनाथ शिंदे… विषय सिद्धीविनायक मंदिर न्यास मंदिरातील दानपेटीतील चोरीबाबत. खरंतर आपण मंदिरात श्रद्धेने जातो. दान टाकतो. धर्मासाठी टाकतो. तिथेच कर्मचारी चोरी करताना पकडले आहे. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी रकमेची मोजदाद ५० लाखांच्या आत होती. कर्मचारी पकडल्यानंतर आठवड्याची दान पेटीची रक्कम दीड कोटी झाली आहे. याचाच अर्थ ही रक्कम जमा होणारी रक्कम लंपास होत होती. दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांचे नुकसान होत होते. याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहे. याची चौकशी करा. वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावा. विश्वस्त मंडळ. राहुल लोंढे, मीना कांबळी, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे यांचं हे पत्र आहे’.

‘१८ कोटी रुपये दर वर्षी सिद्धीविनायक मंदिरातून चोरी होत आहे. आपण दानपेटीत टाकतो. ही माणसं चोरी लुटत आहे. हेच तरुण परीक्षावेळी पायऱ्या झिजवतात. देवाकडे जातात. तिथेच चोरी होते. तिथलेच विश्वस्त चोरी करतात. हा आमचा धर्म. सरकारवर विश्वास ठेवता येत नाही. म्हणून मंदिरात जावं तर मंदिरातच चोऱ्या होतात. होईल काय रस्त्यावरच लोक येतील. आपण देशाचा विचार केला पाहिजे. राजकारण बाजूला ठेवा. निवडणुका येतील तेव्हा वेगळा विचार करू. आज का झालं. उद्रेक का झाला. या गोष्टी समजायला नको. याला अनेक पापुद्रे आहेत. ही गोष्ट सरकारने समजून घेतली पाहिजे. तरुणांच्या आकांक्षा समजून घेतल्या पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Follow Us
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?