कंत्राटदार गुजरातचे, महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मलाच नाही का? राज ठाकरेंचा थेट सवाल, नाशिकच्या..

राज ठाकरे यांनी नुकताच सरकारवर जोरदार टीका केली. राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दाैऱ्यावर आहेत. नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले. यासोबतच नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरही ते बोलताना दिसले.

कंत्राटदार गुजरातचे, महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मलाच नाही का? राज ठाकरेंचा थेट सवाल, नाशिकच्या..
Raj Thackeray
| Updated on: Aug 07, 2026 | 11:00 AM

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दाैऱ्यावर आहेत. नाशिक दाैऱ्याचा त्यांचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात त्यांनी सरकारवर टीका केली. शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? दुसऱ्यांच्या आया बहिणी काढण्याचा अधिकार त्यानाच आहे का? नाशिकच्या खड्ड्यांवर बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. पुढे राज ठाकरे यांनी म्हटले की, तुमच्या माध्यमातून आमच्या कानावर गोष्टी येतात. शहरात खड्डे पडले आहेत. माणसं गेली त्यात. या प्रशासनाला काही नाही. ते ढिम्म आहे. माणसं मेल्याचं गेल्याचं त्यांना सोयरसुतक नाही. फक्त कमिशन कसे मिळेल हाच भाग आहे. अनेक कंत्राटदार गुजरातचे आहेत. महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मालाच आले नाही हा भाग आहे. वरून आदेश येतील त्यानुसार कुंभमेळे होत आहेत.

महाराष्ट्रातील सर्व गोष्टी वरून आदेश आल्यावरच केल्या जातात. हे त्यांना लखलाभ असो. आम्ही केलेल्या गोष्टींची वाट लावली जात आहे. दुसऱ्याने केली म्हणून वाट लावली जात आहे. स्मार्ट सिटींचं काय झालं. कुठे गेल्या. सर्व शहरं बरबाद होताना दिसत आहेत. ज्या प्रकाराने निवडणुका हाताळल्या जात आहेत त्या फ्रॉड पद्धतीने हाताळल्या जात आहे.

लोकांनाही कळतंय. पण मतदान करणाऱ्यांना या गोष्टी कळल्या पाहिजे. नाशिकमध्ये झाडे तोडली जातात. प्रशासन ढिम्म आहे. तरीही लोक भाजपला निवडून देत असतील तर भोगा. अजून काय बोलू शकतो. खासगी कोचिंग क्लासेसवरही त्यांनी आरोप केले. नीट पेपरफुटी ही खासगी कोचिंग क्लासेसमधूनच झाल्याचा आरोप त्यांनी केला.

यासर्व गोष्टींचे उत्तर सरकारने द्यावे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजपावर टीका करताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या महत्त्वांकाक्षा मोठ्या झाल्या आहेत. प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचं आहे. शत्रू संपवण्याची प्रक्रिया भाजपमध्ये सुरू झाली आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यातही भाजपाविरोधात भूमिका घेताना राज ठाकरे दिसले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us