
ठाण्यातून शिवसेनेची सुरुवात झाली होती. याच ठाण्यात उद्धव आणि राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी महानगर पालिका निवडणूकीत पैशाची कशी आमीष दाखवले जात आहेत त्यांचा उल्लेख केला. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आसुड ओढले. राज ठाकरे पुढे म्हणाले की त्या दिवशी नाशिकच्या सभेत बोललो होतो. वेडेपिसे झाले आहेत. एका ठिकाणी एका माणसाने स्क्रुटीनी असते. समोरच्याचा एबी फॉर्म गिळला. दिवस नव्हता. एखादा दिवस मिळाला असता तर वाट तरी पाहता आली असती दुसऱ्या दिवशी एबी फॉर्म पडेल असे राज ठाकरे यावेळी म्हणाले तर सभागृहात एकच हशा उसळला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की सोलापूरमध्ये आमच्या माणसाचा खून झाला. विद्यार्थी संघटनेचा शहर अध्यक्ष होता. फॉर्म मागे घेण्यासाठी मारलं. हे कोणतं राज्य आहे. बिनधास्त सर्व गोष्टी सुरू आहेत असेही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे म्हणाले की ,’ मला खरं तर म्हणून ती माणसं आणायची होती. पाच पाच हजाराला मतं विकत आहेत. मी फक्त दोन तीन लोकांची नावे घेतो. बाकीची येतील असेही ते म्हणाले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की शैलेश धात्रक, मनिषा धात्रक आणि पूजा धात्रक तिघे उभे आहेत. किती पैशाची ऑफर झाली असेल. कल्पनाही करता येणार नाही. या तीन लोकांना एका घरात मिळून १५ कोटींची ऑफर दिली गेली. मला त्यांना मुद्दाम बोलवायचे होते. ते १५ कोटींची ऑफर नाकारून निवडणुकीला उभे राहिले. १५ कोटींची ऑफर नाकारणारे कुठे आणि पाच पाच हजारात मते विकणारे कुठे. या येथे आपल्या राजश्री नाईक आल्या आहेत. त्यांना पाच कोटींची ऑफर झाली असेही राज ठाकरे यांनी सांगितले.