MNS: पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते कुणाचा नामकरण सोहळा पार पडला? बाळाचं नाव ठेवलं यश!

मूळचा परभणीचा पदाधिकारी असलेला निशांत कमळू हा त्याच्या पत्नीसह पुण्यात आला होता. यावेळी निशांत याने आपल्या बाळाचे नामकरण तुम्ही करावे, अशी विनंती राज ठाकरेंकडे केली.

MNS: पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते कुणाचा नामकरण सोहळा पार पडला? बाळाचं नाव ठेवलं यश!
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 1:46 PM

परभणीः  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी राज ठाकरेंना भेटायला अनेक जिल्ह्यांतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी होते. याच पदाधिकाऱ्यांपैकी एका राज ठाकरेंकडे वेगळीच मागणी केली. सुरुवातीला ही मागणी पुरी करण्यासाठी राज ठाकरेंनी नकार दिला. पण कार्यकर्ताही हट्टाला पेटला होता, अखेर राज ठाकरेंना त्याची मागणी पुरवावीच लागली.

परभणीच्या पदाधिकाऱ्याच्या बाळाचे नामकरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. तिथे मूळचा परभणीचा पदाधिकारी असलेला निशांत कमळू हा त्याच्या पत्नीसह पुण्यात आला होता. यावेळी निशांत याने आपल्या बाळाचे नामकरण तुम्ही करावे, अशी विनंती राज ठाकरेंकडे केली. सुरुवातीला राज ठाकरे यांनी त्याला विनम्रपणे नकार दिला. मात्र नंतर पदाधिकाऱ्याचा हट्ट पुरवत त्याच्या बाळाचे नामकरण केले. राज ठाकरे यांनी या बाळाचं नाव यश ठेवलं.

परभणीच्या पदाधिकाऱ्याची आनंदी प्रतिक्रिया

दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवल्याबद्दल परभणीचे पदाधिकारी निशांत कमळू यांनी आनंदयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरेंनी नाव ठेवल्यामुळे आमच्या मुलाचे भविष्य उज्वल होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

इतर बातम्या-

Nashik| नाशिक विभागातील 170 आश्रमशाळा तब्बल 2 वर्षांनी सुरू; पालकांचे संमतीपत्र बंधनकारक

MNS: राजसाहेब माझं काय चुकलं? पुण्यानंतर औरंगाबाद मनसेतही अस्वस्थता, कुणाची होतेय घुसमट?