MNS: राजसाहेब माझं काय चुकलं? पुण्यानंतर औरंगाबाद मनसेतही अस्वस्थता, कुणाची होतेय घुसमट?

पुण्यातील मनसेच्या फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेतील अस्वस्थता बोलून दाखवत राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारला आहे. आता औरंगाबादेतही मनसेतील सुहास दाशरथे अस्वस्थ आहेत.

MNS: राजसाहेब माझं काय चुकलं? पुण्यानंतर औरंगाबाद मनसेतही अस्वस्थता, कुणाची होतेय घुसमट?
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 10:48 AM

औरंगबाादः पुण्यातील फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी मनसेतून राष्ट्रवादीचा (NCP) मार्ग स्वीकारला. आता त्यापाठोपाठ औरंगाबादमध्येही मनसेतील अस्वस्थता उघड झाली आहे. औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांनी ही अस्वस्थता टीव्ही 9 च्या प्रतिनिधींसमोर बोलून दाखवली. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा औरंगाबाद दौरा होता. या दौऱ्यात राज ठाकरेंनी औरंगाबादमधील कार्यकारिणीत तडकाफडकी बदल केले. 14 डिेसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदावरून सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांची उचलबांगडी केली. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून मनसेत आलेल्या सुहास दाशरथेंबाबत अशी कारवाई केल्याने त्यांच्या मनातील अस्वस्थता उघड झाली आहे.

सुहास दाशरथे अस्वस्थ, काय म्हणाले?

जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर सुहास दाशरथे चांगेलच अस्वस्थ आहेत. माझं काय चुकलं, असा सवाल त्यांनी राज ठाकरे यांना केलाय. ते म्हणाले, मला पदावरून बाजूला केलं आहे. महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन. पण माझा एकच प्रश्न आहे. साहेब माझं काय चुकलं. मी काम करतोय, पक्ष संघटना बांधणीसाठी काम करतोय, कालच्या दौऱ्यातही स्वागतापासून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी झटलो. पण माझं काय चुकलं हा खूप मोठा प्रश्न मनात आहे.  ज ठाकरेंनी जी जबाबदारी आज माझ्यावर सोपवली आहे. ती निष्ठेनं पार पाडायला मी तयार आहे. मी पुन्हा महाराष्ट्रसैनिक म्हणून काम करायला, झेंडे बांधायला, संतरंज्या टाकायला तयार आहे. फक्त हे का घडलं, याचं स्पष्टीकरण मला हवं आहे.”

मनसे सोडण्याच्या तयारीत तुम्ही आहात का, असा प्रश्न विचारल्यावर सुहास दाशरथे म्हणाले, ‘माझ्याकडे आज फक्त दोन गोष्टी आहेत. निष्ठा आणि स्वाभिमान. शिवसेनेत असतानाही मी त्याच निष्ठेनं आणि स्वाभिमानानं काम केलं, आजही त्याच गोष्टींच्या आधारे काम करतोय. यावर राजसाहेब जो निर्णय घेतील, त्यानुसारच मी काम करेन. ‘

मनसेच्या कार्यकारिणीत कोणते बदल?

अनेक महिन्यानंतर औरंगाबादेत आलेल्या राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारीणीत मोठे बदल केले. यात सर्वात मोठा बदल म्हणजे जिल्हाध्यक्ष पदावरून सुहास दाशरथे यांची उचलबांगडी केली. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात शहराध्यक्ष सतनाम गुलाटी यांना राज्य उपाध्यक्ष करण्यात आले. हे पद पूर्वी सुमित खांबेकर यांच्याकडे होते. आता सुमित खांबेकर हे पूर्व, पश्चिम, मध्य मतदार संघासाठी तर गंगापूर, वैजापूर, पैठणसाठी दिलीप बनकर आणि फुलंब्री, सिल्लोड, कन्नड तालुक्यासाठी वैभव मिटकर हे जिल्हाप्रमुख असतील. महानगरपर्मुख म्हणून बिपीन नाईक, शहराध्यक्ष आशिष सुरडकर, गजन गौडा यांच्यावर जबाबदादरी देण्यात आली. मध्य मतदार संघासाठी अद्याप कुणाचीही नेमणूक लेलेी नाही.

इतर बातम्या-

धक्कादायकः दहा रुपयांसाठी कुणी जीव जाईपर्यंत मारतं का? काय घडलं औरंगाबादेत?

Aurangabad: शहरात 70 हजार नागरिकांनी चुकवला दुसरा डोस, 44% लोकांचेच लसीकरण पूर्ण! आजपासून 500 रु. दंड!

Non Stop LIVE Update
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला.
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर...
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर....
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन.
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका.
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला.
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?.
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?.
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्...
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्....
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण.
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी.