
मराठीच्या मुद्यावरून एकत्र आलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा संयुक्त असा विजयी मेळावा आज वरळी डोममध्ये पार पडला. हजारो कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, सेलिब्रिटी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रथम राज ठाकरेंची आणि नंतर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेला एकजूट राहण्याचा संदेश दिला. ‘ आपली ताकद एकजुटीत हवी. दरवेळी संकट आलं की एकत्र येतो. संकट गेल्यावर भांडतो. आता हा नतद्रष्टपणा करायचा नाही ‘ असं आवाहन उद्धव ठाकरेंनी तमाम मराठी जनांना दिलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
जो दिल्लीचे पाय चाटतो त्याला बाटगे म्हणतो. मुंबई मराठी माणसाने मिळवली. तेव्हाचे सत्ताधारी होते. ते मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हते. सका पाटील बोलले होते. यावश्चंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळत. मराठी माणसाने झुकवलं. कशासाठी हा घोळ घालत आहात. माझ्या डोक्यात एक विचार आहे. पटतं की नाही बघा. यांचं हे काही सुरू आहे. तेव्हा काश्मीरमध्ये ३७० कलम होतं. ते हटवण्यासाठी शिवसेने पाठिंबा दिला. त्यांनी घोषणा दिली. एक निशाण, एक विधान, एक संविधान. बरोबर आहे. तिरंगा एकच हवा असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
हिंदीची सक्ती मान्य नाही
भाजपचं भांडी धुवायचं फडकं नको. ते फडकं नको. आता वन नेशन वन इलेक्शन सुरू केलं. हिंदू हिदुस्थाना. हिंदुस्तान मान्य आहे. पण हिंदीची सक्ती मान्य नाही. फेक नरेटिव्ह करता. उद्धव ठाकरे एवढं काम करत होता तर सरकार का पाडलं,? असा सवालही त्यांना विचारला. मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली. त्याचा अभिमान आहे. काय केलं. महाराष्ट्रात मराठी सक्तीची करावी लागली. मराठीचे दुश्मन कोण आहे. पण महाराष्ट्रात मराठी सक्ती केल्यावर काही लोक कोर्टात गेले. ती गुंडगिरी नाही होत. आता कोण तरी भेडिया. ही यांची सर्व पिल्लावळ आहे. तोडाफोडा आणि राज्य करा. आपण ज्या गोष्टी केल्या होत्या. म्हणतात शिवसेनेने काय केलं. राज तुला सोबत घेतो. तेव्हा आपण एकत्र होतो. आता एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्ही गद्दारी केली आणि आमचे सरकार पाडलं
मराठी माणूस मुंबईबाहेर नेला म्हणतात. मग १४ वर्षात तुम्ही मराठी माणूस घालवला, उद्योगधंदे, मोठे ऑफिस घालवले. कुठे गेले. तेवढाच हिंदुस्तान आणि तेवढेच हिंदू आहेत का. आम्ही सर्व करत होतो. तुम्ही गद्दारी केली आणि आमचे सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे बसले. त्यांचे बुट चाटण्यासाठी तुम्ही हे करत आहात अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.
आपल्या डोळ्यांदेखत लचके तोडले जात आहे. किती काळ सहन करायचं. प्रत्येकवेळी काय झालं की भांडाभांडी करणार. आम्ही एकत्र आल्यावर सत्ताप्राप्ती. काही म्हणतात यांचा म मराठीचा नाही. म महापालिकेचा आहे. अरे म महाराष्ट्रही काबीज करू. आज निवडणुका नाही. सत्ता येते जाते. आपली ताकद एकजुटीत हवी. दरवेळी संकट आलं की एकत्र येतो. संकट गेल्यावर भांडतो. आता हा नतद्रष्टपणा करायचा नाही. गेल्या विधानसभेत त्यांनी बटेंगे तो कटेंगे केलं, अशा शब्दांता उद्धव ठाकरेंनी हल्ला चढवला.