पूर्वी गोरे इंग्रज होते पण आता…, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी कडाडले, जोरदार हल्लाबोल

पुण्याच्या ओतुरमध्ये बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूर्वी गोरे इंग्रज होते, आता काळे इंग्रज आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या शोषणाची पद्धत तीच आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

पूर्वी गोरे इंग्रज होते पण आता..., शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी कडाडले, जोरदार हल्लाबोल
Raju Shetti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 10:04 PM

पुण्याच्या ओतुरमध्ये बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूर्वी गोरे इंग्रज होते, आता काळे इंग्रज आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या शोषणाची पद्धत तीच आहे, असा घणाघात यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे. दरम्यान तीन वर्ष शेती पडीक राहिली तर ती सरकार जप्त करू शकतं, असा कायदा येऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. यावरून देखील राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  तीन वर्षे शेती पडीक ठेवल्यास ती जप्त करणार असाल, तर कोकणातील सर्व शेती जप्त करावी लागेल असं यावेळी राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

काळ आणि परिस्थिती बदलली असली, तरी शेतकऱ्यांच्या शोषणाची पद्धत अद्याप बदललेली नाही. पूर्वी शेतकरी इंग्रजांच्या धोरणांविरोधात लढत होता. आजही धोरणे, परिस्थिती आणि मानसिकता तीच आहे, फक्त धोरण ठरवणारे पूर्वी ‘गोरे इंग्रज’ होते आणि आता ‘काळे इंग्रज’ आहेत, असा हल्लाबोल यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे. पूर्वीच्या काळातील प्रस्थापितांची जागा आता अदानी आणि अंबानी यांनी घेतली आहे, त्यापलीकडे व्यवस्थेत कोणताही मूलभूत बदल झालेला नाही, असंही यावेळी शेट्टी यांनी म्हटलं.  शेती तीन वर्षे पडीक ठेवल्यास ती सरकार जप्त करेल, या महसूल मंत्र्यांच्या वक्तव्यावर शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारने असा निर्णय घेतल्यास कोकणातील संपूर्ण शेती जप्त करावी लागेल, असा टोला त्यांनी लगावला.

Loading...

तुकड्या-तुकड्यांच्या शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी गटशेती आणि कम्युनिटी फार्मिंगचा पर्याय स्वीकारण्याची गरज आहे.  दिल्लीत एफटीए अर्थात फ्री ट्रेड एग्रीमेंटच्या निर्णयाच्या हालचाली सुरू असून, या करारामुळे भारतीय शेतीसमोर मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते, तर भारतीय शेतकरी उणे सबसिडीवर शेती करत आहेत.   भारतीय शेतकरी स्पर्धेला घाबरत नाही, मात्र अमेरिका आणि भारतातील शेतीची स्पर्धा समान पातळीवर असावी, असंही यावेळी राजू  शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us