AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! कोल्हापुरात तुफान राडा, राजू शेट्टी, क्षीरसागर यांचे समर्थक भिडले, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला आहे. यामुळे कोल्हापुरच्या शिवाजी महाराज चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोठी बातमी! कोल्हापुरात तुफान राडा, राजू शेट्टी, क्षीरसागर यांचे समर्थक भिडले, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
kolhapur RadaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 03, 2026 | 4:54 PM
Share

कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी काल छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजू शेट्टी यांच्या प्रतिमेला कोल्हापुरी पायताण मारून आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शक्तिपीठ विरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे. राजेश क्षीरसागर समर्थकांनी केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शक्तिपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला आहे. यामुळे कोल्हापुरच्या शिवाजी महाराज चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात राडा

काल याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी राजू शेट्टी यांच्या प्रतिमेला कोल्हापुरी पायताण मारून निषेध व्यक्त केला होता. या घटनेनंतर आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने त्याच ठिकाणी आंदोलन करत प्रत्युत्तर दिले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र तरीही दोन्ही नेत्यांचे समर्थक आमनेसामने आले आणि मोठा राडा झाला.

राजू शेट्टी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजू शेट्टी यांच्या प्रतिमेला कोल्हापुरी पायताण मारून आंदोलन केले होते, त्याच ठिकाणी राजू शेट्टी यांच्या समर्थकांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत कालच्या आंदोलनाचा निषेध केला. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर यांच्यातील हा वाद आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र परिसरात मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला असल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?