राळेगणसिद्धी ग्राम पंचायत वर्षानुवर्ष बिनविरोध कशी?

| Updated on: Jan 15, 2021 | 8:16 PM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

राळेगणसिद्धी ग्राम पंचायत वर्षानुवर्ष बिनविरोध कशी?
Follow us on

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हाव्या यासाठी आव्हान केलं होतं. त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. निलेश लंके यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या सुपे इथं पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. खरंतर, गेल्या अनेक वर्षापासून राणेगणसिद्धीमध्ये बिनविरोध निवडणुका पार पडतात. यामुळे यंदाही निलेश लंके यांच्या प्रयत्नांनी निवडणूक ही बिनविरोध पार पडणार आहे.(Ralegan Siddhi Gram Panchayat election Parner taluka will be contested without any objection nilesh lanke decision)

राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या संकटात या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अनोखी शक्कल लढवली होती. गावांमधील निवडणुका बिनविरोध पार पाडा आणि 25 लाखांचा विकास निधी मिळवा, अशी घोषणाच निलेश लंके यांनी केली होती. बिनविरोध निवडणुका करून शासनाचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली होती. त्यामुळे यावर बैठक घेत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात आणि शासनाचा खर्च वाचावा म्हणून लंके यांनी ही शक्कल लढवली होती. तालुक्यातील जी गावे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पाडेल त्या गावाला 25 लाखांचा निधी देण्यात येईल, असं लंके यांनी सांगितलं होतं. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. यासोबतच, त्यांच्या या निर्णयाची ग्रामस्थ अंमलबजावणीही केल्याचं पाहायला मिळत आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

आता निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2020च्या आदेशान्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 14234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 7 डिसेंबर 2020पर्यंत त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत. 9 डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. (Ralegan Siddhi Gram Panchayat election Parner taluka will be contested without any objection nilesh lanke decision)

संबंधित बातम्या:

पक्षवाढीसाठी राज ठाकरेंनी फिरलं पाहिजे; चंद्रकांतदादांचा सल्ला

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

(Ralegan Siddhi Gram Panchayat election Parner taluka will be contested without any objection nilesh lanke decision)