
“पैशांसाठी खालच्या लेव्हला कोण गेलं, हे मी सांगणार आहे. तिथून बदनामी करायला सुरुवात झाली. ड्रमबीट बार कुणाचा आहे? ड्रमबीट बार ठाकरे कुटुंबाचा आहे. तो बंद का झाला? लायसन्स रद्द का झालं? कोणावर तुम्ही आरोप करताय, मी काळे, खोटे धंदे केले नाहीत. तो एफआयआर वाचला. त्यात लिहिलेलं 14 मुलींची वेटरसाठी परवानगी घेतलेली. त्यात एक मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती. म्हणून तो डान्सबार होतो का?” असा सवाल रामदास कदम यांनी विचारला. ते अनिल परब यांनी केलेल्या आरोपांवर बोलत होते. “मला कळल्यावर मी हॉटेल बंद केलं. लायसन्स सुद्ध सबमिट केलं. त्यानंतर दीड महिन्यांनी सभागृहात त्यांनी हा विषय मांडला” असं रामदास कदम म्हणाले.
“भाडखाऊ, भाडखाऊ म्हणतात भाड कोण खातं ते सांगतो. बाळासाहेबांच्या बाबतीत त्यांची बदनामी होईल असं कोणतही वक्तव्य मी करणार नाही. बाळासाहेब आमचे दैवत होते, आहेत आणि राहणार” असं रामदास कदम यांनी सांगितलं. उद्धवजींनी मला सांगितलेलं हाताचे ठसे घेण्याबद्दल. यात काय वाईट आहे? स्विस बँकेसाठी घेतले असं का वाटतं? मी फक्त संशय व्यक्त केला. मला त्या खोलात जायचं नाही” असं रामदास कदम म्हणाले.
‘तुझ्या बापाला विचारुन निर्णय घेणार नाही’
“बाळासाहेबांची बदनामी होईल असं कुठलही वक्तव्य मी करणार नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हाअकलेचे दिवे पाझळले. मी गृहराज्यमंत्री होतो, गृहराज्यमंत्र्याला अधिकार असतात, त्याचं समाधान झालं असेल, त्याच्यावर एकही केस नाही आणि तो एक शिक्षक, बिल्डर असेल कोर्टात क्लीनचीट दिली असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. तुझ्या बापाला विचारुन निर्णय घेणार नाही” अशी आक्रमक भाषा रामदास कदम यांनी केली.
रामदास कदम यांनी काय गौप्यस्फोट केला?
“योगेश कमदला विचारलं मी, विधिमंडळाच्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेत विधिमंडळात मंत्र्यांना देखील आदेश देणार अशा व्यक्तीने त्याला सांगितलं, तो पण न्यायाधीशच आहे. योगेश कदमने सांगितल तो न्यायाधीशच आहे, मला नवा घ्यायचं नाही. त्याचं नाव योगेश कदमने मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. मोठी व्यक्ती आहे. उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने शिफारस केल्यानंतर ही व्यक्ती स्वच्छ असेल, म्हणून गृहराज्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. कागदपत्र होते” असं रामदास कदम म्हणाले. सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याच्या योगेश कदमांच्या निर्णयावर रामदास कदम यांनी हा गौप्यस्फोट केला.