उद्धव ठाकरेंनी ज्ञानेश कुमारांचा बाप काढला; आता वादात अमित शहांची एन्ट्री, भाजप प्रदेशाध्यक्षांचे विरोधकांना 4 सवाल
उद्धव ठाकरेंनी ज्ञानेश कुमारांचा बाप काढत टीका केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा व्हिडिओ पोस्ट चव्हाणांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

केंद्रीय निवडणूक आयोग आणि आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात वातावरण पेटलं आहे. देशभरातील सर्व राजकीय पक्षांकडून आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची देखील मागणी केली जात आहे. महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं. त्यानंतर आज रविवारी ठाकरे बंधूंनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चा काढला. या मोर्चाच्या सांगता सभेत उद्धव ठाकरेंनी ज्ञानेश कुमार आणि अमित शहा यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गर्जना मोर्चावरून ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार केला आहे.
पंतप्रधान आता घुसखोरांनी ठरवायचे का? रविंद्र चव्हाणांचा सवाल
रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लोकसभेतील व्हिडिओ पोस्ट करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच काही प्रश्न विरोधकांना केले. अमित शहांनी विरोधकांना विचारलेले प्रश्न चव्हाणांनी पोस्ट केले आहेत. रविंद्र चव्हाण यांनी पोस्ट म्हटलं की, ‘देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण असावे, हे घुसखोरांनी ठरवायचे का ? तसे झाले तर लोकशाही सुरक्षित राहील का? एका मतदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदान करण्याची मुभा असावी का ? मृत्यू पावलेल्या नागरिकांना मतदार यादीत स्थान असावे का? असे प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्षांनी विरोधकांना विचारले.
📌 देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण असावे, हे घुसखोरांनी ठरवायचे का ? तसे झाले तर लोकशाही सुरक्षित राहील का ?
📌 एका मतदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदान करण्याची मुभा असावी का ?
📌 मृत्यू पावलेल्या नागरिकांना मतदार यादीत स्थान असावे का ?
SIR ला विरोध करणाऱ्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत !
#SIR #ElectoralRoll #AmitShah #BJP4Maharashtra
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) October 4, 2026
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरेंनी टीका करताना म्हटलं की, ‘स्थानिक पातळीवर वैध अवैध पातळीवर ठरविण्याचा अधिकार दिल्लीत आहे. बीएलओ वगैरे…हे ज्ञानेश कुमार ठरवणार? भारत देश काय ज्ञानेश कुमार यांच्या बापाचा आहे का? ज्ञानेश कुमार यांनी नेमणुकीत पक्षपातीपणा करण्यात आला. ज्ञानेश कुमार निवृत्त झाले, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. पंतप्रधानांना सरंक्षण नसेल, ज्ञानेश कुमार यांना का आहे? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.