तिघांची लढत, जोरदार भिडत, वसंत मोरे यांची एंट्री होताच रवींद्र धंगेकर म्हणाले, मी…

मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर पुण्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी आधीच जाहीर झाली आहे. त्यामुळे पुण्यात आता धंगेकर आणि मोरे यांच्यातही लढत पहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी वसंत मोरे यांना एक खास सल्ला दिला आहे.

तिघांची लढत, जोरदार भिडत, वसंत मोरे यांची एंट्री होताच रवींद्र धंगेकर म्हणाले, मी...
रविंद्र धंगेकरांनी वसंत मोरेंना दिला खास सल्ला
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 10:22 AM

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख आता अवघ्या काही दिवसांनवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. महाराष्ट्रातही वंचित बहुजन आघाडीने नव्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून पुण्यातील उमेदवाराचंही नाव जाहीर करण्यात आलं आहे. मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर पुण्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी आधीच जाहीर झाली आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांचं नावही आधीच जाहीर झालं आहे. त्यामुळे पुण्यात आता तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. वंचितकडून वसंत मोरे यांचं नाव जाहीर झाल्यावर धंगेकर यांनी प्रतिक्रिया देत मोरे यांना एक खास सल्ला दिला आहे. ‘डोकं शांत ठेवा ‘ ठेवा असा सल्ला धंगेकरांनी मोरेंना दिला आहे.

काय म्हणाले रविंद्र धंगेकर ?

ही निवडणूक पुणेकर लढणार आणि पुणेकरच जिंकणार आहेत. लोकशाहीमध्ये कोणीही कुठूनही निवडणूक लढू शकतो, तो ज्याचा त्याचा संविधानिक अधिकार आहे. जो उमेदवार लोकशाहीसाठी लढेल, लोक त्यालाच मतदान करतील. वचिंत बहुजन आघाडीने वसंत मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. वसंत मोरे अनेक पक्षातील नेत्यांना आणि लोकांना भेटले . ते कोणत्याही पक्षात गेले तरी ते निवडणूक लढवणारच होते. डोकं शांत ठेवा, असाच सल्ला मी त्यांना देईन, असे रविंद्र धंगेकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मी पुणेकर आणि मी धंगेकर

मी पुणेकरांचा उमेदवार आहे. गेले कित्येक वर्ष पुणेकरांनी मला आशीर्वाद दिला आहे. माझा विजय निश्चित मानला जातोय, त्यामुळे मी माझ्या पुण्यासाठी मतदान मागणार आहे. लोकशाहीत अधिकार आहे, सर्वांना संधी मिळते .कोणी कुठूनही उभे राहावे.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 69 हजारांच्या जवळपास मते खाल्ली होती. यावर रविंद्र धंगेकर स्पष्टपणे बोलले, मतदार सुज्ञ आहेत ते योग्य व्यक्तीला मतदान करतील. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता इंडिया आघाडीला पुणेकर मतदान करताना पाहायला मिळतील. लोकशाहीसाठी जनता इंडिया आघाडीच्या मागे उभे राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपने धंगेकरांना शिक्षणावरून केले होते ट्रोल

दरम्यान जेव्हापासून काँग्रेसने धंकेगरांना उमेदवारी जाहीर केली आहे, तेव्हापासून ते सतत चर्चेत आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजपने धंगेकरांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात केली होती. पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला, भाजपकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे चांगलेच ट्रोलिंग सुरू झाले. रविंद्र धंगेकर यांच्या शिक्षणावरून भाजपने त्यांना ट्रोल केले. . ‘मविआचा अशिक्षित उमेदवार’, ‘रवींद्र धंगेकर फक्त 8वी पास !’ , ‘शिक्षणाचे माहेरघर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित’ असं लिहीलेला आणि धंगेकरांचा फोटो असलेला मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला. भाजपने या माध्यमातून धंगेकरांचं शिक्षण काढत त्यांना ट्रोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

धंगेकरांनी दिलं चोख प्रत्युत्तर

मात्र भाजपचं हे ट्रोलिंग धंगेकरांनी फारसं मनावर घेतलं नाही, उलट त्यांनी या ट्रोलर्सचा पुरेपूर समाचार घेत चोख प्रत्युत्तर दिलं. ‘ ते माझ्या शिक्षणावर घसरलेत म्हणजे ( त्यांना) त्यांचा पराभव दिसतोय’ असे सांगत माझी जनतेत पीएचडी झाली आहे, जनतेनं मला पीएचडीचं प्रमाणपत्र दिलं आहे असा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केला. एवढंच नव्हे तर धंगेकर यांनी भाजप नेते, पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. तसेच भाजपमध्ये सध्या विविध पक्षांतून सुरू असलेल्या इनकमिंगबद्दल बोलतही त्यांनी त्यावर निशाणा साधला. ‘अबकी बार 400 पार’ असा भारतीय जनता पक्षाचा यंदाच्या निवडणुकीत नारा आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्याचे आवाहनही भाजपकडून केले जात आहे. याच मुद्यावरून धंगेकर यांनी टीका केली आहे. ‘हू इज़ धंगेकर’ म्हणून मला ट्रोल केलं जातंय, पण देशात जर मोदींची हवा असती तर भाजपला अजित पवार ,अशोक चव्हाण यांना पक्षात घ्यावं लागलं नसतं असा चिमटा धंगेकर यांनी काढत भाजपवर टीकास्त्र सोडलं.

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.