नाशिकच्या रामकुंड परिसरात खोदकाम करताना आढळले प्राचीन शिवमंदिराचे अवशेष

नाशिकच्या रामकुंड परिसरात खोदकाम करताना एका प्राचीन शिवमंदिराचे अवशेष सापडले आहेत. येथे आणखीही काही मंदिरं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिकच्या रामकुंड परिसरात खोदकाम करताना आढळले प्राचीन शिवमंदिराचे अवशेष
shivmandir
| Updated on: Nov 23, 2026 | 5:16 PM

नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना रामकुंड परिसरात खोदकाम सुरु असताना जमिनीत एका जून्या शिवमंदिराचे अवशेष सापडले आहे.तसेच या भागात दुतोंड्या मारुतीसमोर हे मंदिर सापडले असून हे मंदिर १७०० पूर्वीचे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिसरात आणखी काही प्राचीन मंदिरं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या खोदकामात सापडलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची मागणी होत आहे.

नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. यावेळी खोदकाम सुरु असताना एक जुने शिव मंदिर आढळले आहे. सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी खोदकाम सुरु असताना दुतोंड्या मारुती समोर हे प्राचीन शिवमंदिराचे अवशेष सापडले आहेत. हे मंदिर सतराव्या शतकातील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिसरात आणखी काही मंदिरे असण्याची शक्यता असल्याने येथे खोदकाम करण्याची मागणी होत आहे.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us