AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahesh Tilekar : मराठीत चांगले सिनेमे येत नाहीत म्हणता, मग आता…महेश टिळेकरांची प्रेक्षकांना कळकळीची विनंती, जितेंद्र जोशीच्या ‘बंधू’ सिनेमासाठी खास पोस्ट

Mahesh Tilekar Post : महेश टिळेकर यांनी जितेंद्र जोशीच्या 'बंधू' सिनेमासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Mahesh Tilekar : मराठीत चांगले सिनेमे येत नाहीत म्हणता, मग आता...महेश टिळेकरांची प्रेक्षकांना कळकळीची विनंती, जितेंद्र जोशीच्या 'बंधू' सिनेमासाठी खास पोस्ट
| Updated on: Nov 23, 2026 | 4:53 PM
Share

सुप्रसिद्ध मराठी निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि सामाजिक तसेच इंडस्ट्रीतील घडामोडींबद्दल भाष्य करतात. अशातच आता महेश टिळेकर यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. दिग्दर्शक आणि लेखक नितीन सुपेकर यांचा ‘बंधू‘ हा सिनेमा 20 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित झालेला. मात्र, या सिनेमाला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळत नाहीये. यासंदर्भात महेश टिळेकर यांनी पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना हा सिनेमा आवर्जून पाहण्याची विनंती केली आहे.

महेश टिळेकर यांची पोस्ट

महेश टिळेकर म्हणाले की, ‘मी नुकताच ‘बंधू‘ हा मराठी सिनेमा पाहिला. ग्रामीण पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा आहे. पण, ग्रामीणच नाही तर शहरी भागातील सिनेप्रेमिकांनी, प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहावा, असा हा उत्तम सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक नितीन सुपेकर हा माझा लाडका प्रतिभावंत लेखक, दिग्दर्शक आहे. त्यानं खूप मेहनतीनं हा सिनेमा बनवलेला आहे. या सिनेमात काम करणारे सर्वच कलाकार यांची कामगिरी, त्यांचा अभिनय तो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. जितेंद्र जोशी, उपेंद्र लिमये यांनी दोन भावांची जी भूमिका साकारली आहे, ती पाहून अक्षरशः डोळे भरून येतात. म्हणजे, काळजाचा ठाव घेणारी ही कथा आहे. मृण्मयी देशपांडे, विठ्ठल काळे यांसारख्या सह–कलाकारांचा अभिनय उत्तम आहेच. पण त्याचसोबत बालकलाकार शौर्य पाटीलचा अभिनय पाहून अवाक व्हायला होतं.’

‘कौटुंबिक नातेसंबंध जपणारा आणि कुटुंबासोबत पाहता येईल असा हा उत्कृष्ट सिनेमा मराठीमध्ये आलेला आहे. मला वाटतं की, बऱ्याचदा प्रेक्षक म्हणतात की, मराठीत चांगले सिनेमे येत नाहीत, त्यामुळे आम्ही सिनेमा बघायला जात नाही. पण, मला आता वाटतं की, तुमची आता जबाबदारी आहे, तुम्हा सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की, तुम्ही सर्वानी हा सिनेमा बघावा, या सिनेमाला भरघोस प्रतिसाद द्यावा. या सिनेमाच्या मागे प्रामाणिक लेखक आणि दिग्दर्शक नितीन सुपेकरची मेहनत आहे. मला वाटतं की, अशा मेहनत घेणाऱ्या कलाकाराच्या मागे महाराष्ट्राने उभं राहिलं पाहिजे.’ असं महेश टिळेकर यांनी शेवटी म्हटलं आहे.

Follow Us
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा