AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट…, नेमकं काय घडतंय?

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे सातत्याने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी अजित पवार यांच्या अपघातावरून देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आता या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट..., नेमकं काय घडतंय?
Rohit PawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 4:46 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात देखील त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. डिलिमीटेशन बिलावरून देखील त्यांनी काही आरोप केले आहेत. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डिलिमीटेशन बिलाला पाठिंबा दिला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत संकेत दिले होते. त्यामुळे रोहित पवार पक्षात एकटे पडले आहेत का?  अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान यावर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी रोहित पवार यांना बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. रोहित पवार हे हिवाळी अधिवेशनादरम्यान ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत, यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले बावनकुळे? 

रोहित पवार यांना विनंती करतो त्यांच्या सरकारकडून काही मागण्या असतील तर त्यांनी बैठकीला यावं. त्यांच्या मागण्या ऐकून घ्यायला आम्ही तयार आहोत, मी त्यांना निमंत्रित करतो, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान  रोहित पवार यांना राजकीय मोर्चा काढायचा आहे का?  असा सवाल करतानाच  बुधवारी त्यांनी आमच्या बैठकीला यावं, समाधान झालं नाही तर मोर्चा काढावा, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी तीन वर्षे जमीन पिकवली नाही तर शासनाकडे जमा करू हा निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नसून  राज्यात काही लोकांनी फार्मसाठी 50 एकर 100 एकर जमिनी घेतल्या आहेत,  अशा जमिनी आठ आठ वर्षांपासून पडीक आहेत, त्यामुळे देशाचं नुकसान होत आहे, त्यांच्यासाठी असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.  यामध्ये सर्व सामान्य शेतकऱ्यांचा काही संबंध नाही, हा नियम कुठल्याही सर्वसाधारण शेतकऱ्याला लागू नाही. ज्यांनी जमिनी खरेदी करून लँड बँक तयार केली त्यासाठी हा निर्णय आहे. अशी जमीन छोट्या छोट्या शेतकऱ्यांना भाडे पट्ट्याने देता येते.  काही लोकांनी जाणीवपूर्वक अर्थाचा बे अर्थ केला, असंही ते यावेळी म्हणाले.

Follow Us
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा