शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द; आता बदल्या होणार मोबाईल अ‍ॅपद्वारे

| Updated on: Apr 25, 2022 | 7:48 AM

राज्यातील शिक्षकांसाठी (Teachers) मोठी बातमी आहे. शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता शिक्षकांच्या बदल्या (Teacher Transfers) या मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार आहेत. सर्व प्रकिया ही ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.

शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द; आता बदल्या होणार मोबाईल अ‍ॅपद्वारे
Follow us on

मुंबई : राज्यातील शिक्षकांसाठी (Teachers) मोठी बातमी आहे. शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता शिक्षकांच्या बदल्या (Teacher Transfers) या मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार आहेत. सर्व प्रकिया ही ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. शिक्षकांच्या बदल्यांचे जुणे धोरण (old teacher transfer policy) रद्द करण्यात आले असून, आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील शिक्षकांच्या बदल्या या मोबाईल अ‍ॅपद्वारे करण्यात येणार आहोत. आता इथूनपुढे बदल्या या ऑनलाईन होणार असल्याने, शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या अ‍ॅपमुळे शिक्षकांची बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यास मदत होणार आहे. नवीन धोरणानुसार आता शिक्षकांना आपल्या बदलीचे आदेश हे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनेच मिळणार आहेत. देशावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट होते, कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या देखील रखडल्या होत्या, मात्र आता निर्बंध हटवण्यात आल्याने यावर्षी शिक्षकांच्या बदल्या अटळ मानल्या जात आहेत. मात्र या बदल्या पारदर्शक पणे व्हाव्यात यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने एका मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपद्वारे आता बदल्या होणार असल्याची माहिती मिळत आहे.

संपूर्ण प्रकिया ऑनलाईन

दरम्यान शिक्षकांच्या बदल्या या दोन टप्प्यात केल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे. बदलीची ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. शिक्षकांना आपली बदली कुठे झाली तसेच संबंधित शाळेची माहिती ऑनलाईनच उपलब्ध होणार आहे. एवढेच नव्हे तर बदलीचे आदेश देखील ऑनलाईन प्राप्त होणार आहेत. ऑनलाईन बदल्यांमुळे बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यास मदत होईल असा विश्वासा शिक्षण विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील शिक्षकांच्या बदल्या या मोबाईल अ‍ॅपद्वारे करण्यात येणार आहोत. आता इथूनपुढे बदल्या या ऑनलाईन होणार असल्याने, शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षकांचा त्रास वाचणार

आता बदली प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने शिक्षकांच्या अडचणी कमी होणार आहेत. या अ‍ॅपचे वैशिष्ट म्हणजे शिक्षकांना बदलीसाठी आता या अ‍ॅपच्या माध्यमातूनच ऑनलाई अर्ज करता येणार आहे. तसेच या अ‍ॅपवरच कुठल्या गावात किती शिक्षकांच्या जाग रिक्त आहेत, दुर्गम गावे कोणती आहेत, तुम्ही कोणत्या गावात बदलीसाठी अर्ज केला आहे, याची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. सोबतच शिक्षकांना बदलीचे आदेश देखील घरबसल्या ऑनलाई प्राप्त होणार आहेत.

इतर बातम्या

Today petrol diesel rate : सलग विसाव्या दिवशी भाव स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

Stock Market : शेअर बाजारात पैसे न गुंतवताही मिळवा उत्पन्न, जाणून घ्या पैसे कसे मिळवाल?

SHARE MARKET: शेअर बाजारात विक्रीचा दबाव, गुंतवणुकदारांत अस्थिरता; जाणून घ्या- मार्केटचा मूड