AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Housing : घरांची मागणी वाढली; जानेवारी ते मार्च 2022दरम्यान पूर्व आणि पश्चिम पुण्यात घरविक्रीच्या प्रमाणात सुधारणा

महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी (MahaRERA) अंतर्गत जानेवारी-मार्च 2022पर्यंत शहरातील 140हून अधिक प्रकल्प नोंदणीकृत झाले. त्यापैकी सुमारे 105 नवीन लॉन्च झाले, तर उर्वरित बांधकामाधीन गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे.

Pune Housing : घरांची मागणी वाढली; जानेवारी ते मार्च 2022दरम्यान पूर्व आणि पश्चिम पुण्यात घरविक्रीच्या प्रमाणात सुधारणा
नवी मुंबई विमानतळाच्या 20 किमीच्या परिसरात इमारतींना 55 मीटरची मर्यादाImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Apr 25, 2022 | 9:13 AM
Share

पुणे : जानेवारी 2022पासून गृहखरेदीच्या (Home buying) प्रमाणात लक्षणीय सुधारणा झाली आहे. मार्च 2022मध्ये तिमाहीच्या अखेरीस, बाजाराने 40-80 लाख बजेट विभागामध्ये 800-1,200 नवीन इन्व्हेंटरीजची भर घातली. वाकड, बोपोडी, खराडी आणि काळेवाडी यांसारख्या पूर्व आणि पश्चिम पट्ट्यातील लोकप्रिय सूक्ष्म-बाजारांनी वरील तिमाहीत (Quarter) घरांच्या मागणीत वाढ नोंदवली, असे एका अहवालातून समोर आले आहे. शहरातील विकासकांनी 100 टक्के परतावा हमीसारख्या योजना सुरू ठेवल्या, ज्यामुळे नवीन गृह श्रेणीतील विक्री वाढण्यास मदत झाली. तसेच, 1 एप्रिल 2022पासून संपूर्ण महाराष्ट्रात मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ करण्याच्या घोषणेने या तिमाहीत प्रलंबित मालमत्ता सौदे बंद करण्यास मदत केली. ऑक्टोबर-डिसेंबर 2022च्या तुलनेत या तिमाहीत गृहनिर्माण (Housing) युनिटच्या नवीन पुरवठ्यात किमान 50 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे.

विक्रीचे प्रमाण उच्चांकी

महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी (MahaRERA) अंतर्गत जानेवारी-मार्च 2022पर्यंत शहरातील 140हून अधिक प्रकल्प नोंदणीकृत झाले. त्यापैकी सुमारे 105 नवीन लॉन्च झाले, तर उर्वरित बांधकामाधीन गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. अहवालानुसार, जानेवारी-मार्च 2022मध्ये टॉप आठ शहरांमधील निवासी बाजारपेठांनी मिळून विक्रीचे प्रमाण चार वर्षांच्या उच्चांकात योगदान दिले.

जानेवारी-मार्च 2022ची स्थिती

डेव्हलपर्सच्या लवचिक पेमेंट योजना आणि तयार घरांवर शून्य-वस्तू आणि सेवा कर (GST) यांच्यामुळे जानेवारी-मार्च 2022मध्ये पुण्यातील निवासी बाजारपेठेत नवीन आणि पुनर्विक्री दोन्ही मालमत्तेची मागणी संतुलित होती. 60-80 लाखांच्या बजेटमधील मिड-सेगमेंट प्रकल्पांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली, विशेषतः पूर्व आणि पश्चिम पुण्यात.

पसंतीची ठिकाणे

वाकड, बोपोडी, खराडी आणि काळेवाडी ही सर्वाधिक पसंतीची ठिकाणे होती, ज्यात 2 BHK तयार घरे जास्तीत जास्त ट्रॅक्शन मिळवतात. धानोरी, औंध आणि विद्यानगर यांसारख्या उत्तरेकडील भागातही एक बेडरूमच्या फ्लॅटची मागणी होती. अशा मालमत्तेचा सरासरी दर सुमारे 30 ls 40 लाख असतो. पुण्यातील सर्वाधिक नवीन लॉन्च वाघोली, रावेत, तळेगाव दाभाडे, वाकड, आणि वडगाव बुद्रुक यांसारख्या परिसरात 40-80 लाखांच्या बजेटमध्ये होते. यापैकी बहुतांश प्रकल्प 2024-26मध्ये ताब्यात घेण्यासाठी नियोजित आहेत.

आणखी वाचा :

NIV on Covishield : कोविशील्डचे दोन्ही डोस पूर्ण झाले? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे, NIVनं दिली महत्त्वाची माहिती

Pune Asim Sarode : हनुमान चालिसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण; पुण्यातल्या नास्तिक मेळाव्यात असीम सरोदेंची टीका

Nashik : आरोग्य विज्ञान विद्यापीठाची पुण्यात जेनेटिक लॅब; कॅन्सर उपचाराला मिळणार चालना, विविध कोर्स होणार सुरू

Follow Us
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...