Nagpur : आयसीयूमध्ये घुसून निवासी डॉक्टरासोबत गैरवर्तन, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Nagpur : नागपूरच्या एम्स रुग्णालयात (AIIMS Nagpur) एका निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तर जाणून घ्या नेमकं काय घडलं आहे.

Nagpur : आयसीयूमध्ये घुसून निवासी डॉक्टरासोबत गैरवर्तन, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?
| Updated on: Sep 23, 2026 | 11:55 AM

Nagpur : डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. आता देखील असंच काही झालं आहे. आहे. नागपूरच्या एम्स रुग्णालयात (AIIMS Nagpur) एका निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. निवासी डॉक्टरला नातेवाइकांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची घटना समोर येत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, थेट आयसीयूमध्ये घुसून निवासी डॉक्टरला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे आरोप होत आहेत. निवासी डॉक्टरला मारल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ डॉक्टरांसमोरच निवासी डॉक्टरची कॉलर पकडून खाली पाडले, तर पाठीवर मारहाण केल्याचा नातेवाइकांवर आरोप करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास प्रकार घडला. 66 वर्षीय रुग्णाला आयसीयू विभागात करण्यात दाखल केलं होतं. तेव्हा आयसीयूमध्ये घुसून मारहाण करण्यात आली.

समोर आलेल्या माहितीनुसार, रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने सोमवारी रात्री रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. श्वास घेण्यास त्रास झाल्याने निवासी डॉक्टरांनी रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्यासाठी नातेवाइकांची परवानगी मागितली. पहाटे 4 वाजताच्या सुमारास नातेवाइकांनी व्हेंटिलेटरसाठी परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.

ड्युटीवरील निवासी डॉक्टर वरिष्ठांच्या सूचनेनुसार करत उपचार करत होते. याचदरम्यान संतप्त नातेवाइकांनी निवासी डॉक्टरला शिवीगाळ आणि मारहाण केली प्रकार वाढताच सुरक्षारक्षकांनी नातेवाइकांना आयसीयूमधून बाहेर काढलं. दरम्यान या प्रकरणी आता मारहाण करणाऱ्या नातेवाइकांवर कारवाईची मागणी निवासी डॉक्टर संघटनेने केली आहे.

तर, संघटनेच्या मागणीसंदर्भात कार्यकारी संचालकांना निवेदन देणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. पण कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. पण आता कोणताच संप पुकारण्याची भूमिका नसल्याचं सांगण्यात येत आहे.

सांगायचं झालं तर, ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. याआधी देखील अनेकदा रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला झाला आहे. ज्यामुळे अनेकदा संप देखील करण्यात आले. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us