35000 कोटींचं पॅकेज, दिले फक्त 15000 कोटी, फडणवीस साहेब खोटं बोलण्यात…रोहित पवारांनी थेट आकडे मांडले!
रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री साहेब खोटे बोलण्यात आणि आकडे फुगवून सांगण्यात अतिशय पटाईत आहेत. गेल्या वर्षी 32000 कोटींचे पॅकेज जाहीर केले, पण प्रत्यक्षात मात्र 15000 कोटीदेखील मिळाले नाहीत, असे रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.

Rohit Pawar : सध्या राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभे पीक पाण्याअभावी सुकून गेले आहे. हातातील पीक गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी शेतातील पीक उपटून टाकले आहे. शेतकऱ्यांची ही स्थिती लक्षात घेऊन सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जातेय. विशेष म्हणजे सत्ताधारी महायुतीदेखील दुष्काळ जाहीर करण्याबाबत सकारात्मक आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच दुष्काळ जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. आम्ही शेतकऱ्यांना याआधीही भरपूर मदत केलेली आहे. भविष्यातही आम्ही शेतकऱ्यांना भरीव मदत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. दरम्यान, आता फडणवीसांचा हा दावा आमदार रोहित पवार यांनी खोडून काढला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर थेट आकडेवारी पोस्ट करून राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जातेय, असा गंभीर आरोप केलाय.
रोहित पवार यांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय?
रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री साहेब खोटे बोलण्यात आणि आकडे फुगवून सांगण्यात अतिशय पटाईत आहेत. गेल्या वर्षी 32000 कोटींचे पॅकेज जाहीर केले, पण प्रत्यक्षात मात्र 15000 कोटीदेखील मिळाले नाहीत. हेक्टरी 17500 रुपये देऊ, अशी घोषणा केली; पण प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांच्या हिशोबाने पीकविम्याचे 5 ते 7 हजार कोटी मिळायला हवे होते, पण राज्यातील शेतकऱ्यांना केवळ 1900 कोटी मिळाले. केंद्र, राज्य आणि शेतकरी मिळून विमा कंपन्यांना 2394 कोटींचा विमा हप्ता जमा झाला; दुर्दैवाने तेवढी रक्कमदेखील शेतकऱ्यांना मिळाली नाही, असा मोठा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री साहेब खोटे बोलण्यात आणि आकडे फुगवून सांगण्यात अतिशय पटाईत आहेत. गेल्या वर्षी ३२,००० कोटींचे पॅकेज जाहीर केले, पण प्रत्यक्षात मात्र १५,००० कोटीदेखील मिळाले नाहीत. हेक्टरी १७,५०० रुपये देऊ, अशी घोषणा केली; पण प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांच्या हिशोबाने… pic.twitter.com/FXA5SWw3GN
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 24, 2026
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे
तसेच मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांच्या हिशोबाने पीकविम्याचे 5200 कोटी रुपये मिळायला हवे होते; परंतु प्रत्यक्षात केवळ 1500 कोटी मिळाले, असेही रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले. तसेच पीकविमा योजनेतील महत्त्वाचे ट्रिगर काढून सरकारने विमा कंपन्यांशी साटेलोटे साधले. शेतकऱ्यांशी दगाफटका केला, असे आरोप करत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.