दादांच्या विमान अपघाताच्या तपासासाठी तुम्ही काय केलं? रोहित पवार यांचा सुनील तटकरेंना थेट सवाल

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता रोहित पवार यांनी या दोघांना थेट सवाल केला आहे.

दादांच्या विमान अपघाताच्या तपासासाठी तुम्ही काय केलं? रोहित पवार यांचा सुनील तटकरेंना थेट सवाल
Rohit Pawar
Image Credit source: Google
| Updated on: Mar 25, 2026 | 7:29 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या निधानानंतर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न या दोघांनी केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. यानंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी 28 जानेवारी 2026 रोजीनंतर पक्षाने केलेला कुठलाही पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यानंतर सुनील तटकरे आणि रोहित पवार यांच्यात जुंपली आहे. आता रोहित पवार यांनी तटकरेंना थेट सवाल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तटकरे-पटेल यांचा गेम फिस्कटला – रोहित पवार

सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रानंतर बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, ‘माझ्या हातात सर्व सूत्रे आहेत, सर्व कागदपत्रे आहेत. माझ्या पक्षाच्या संविधानाने मला सर्व अधिकार दिले आहेत. हे ज्या नेत्यांना मिरवायचं आहे, यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा सर्व कंट्रोल हातात घ्यायचा गेम होता. स्व:ता हिरो बनायचं आणि दिल्लीची आणि ईडीची कारवाई आपल्यावर येणार नाही यासाठी जो गेम होता तो फिस्कटला आहे. काकींना या गोष्टी आता कळालेल्या आहेत, त्यांनी पक्षाचा ताबा घेतला आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी आमदार आणि कार्यकर्त्यांची काळजी घेतली आणि पार्टीवर कंट्रोल हवा आहे अशा नेत्यांना बाजूला ठेवलं तर पार्टीला कुठेही धोका असणार नाही. तमाम महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे की अजित दादांना न्याय मिळाला पाहिजे.ट

दादांच्या अपघाताचा तपासासाठी तुम्ही काय केलं?

सनील तटकरे यांनी दादांच्या निधनादिवशी विलीनीकरणाचा विषय काढला होता. महाविकास आघाडीच्या स्नेह भोजनाला हे गेले नाहीत असंही म्हटलं. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘स्नेह भोजनवेळी मी कर्नाटकमध्ये होतो. त्यामुळे जेवायला येता आलं नाही. मी थेट बोलतो की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही सत्तेत असून दादांच्या अपघाताचा तपास योग्य पद्धतीने व्हाव यासाठी तुम्ही काय केलं? स्मरणपत्र दिलं. त्याच्या पलीकडे जाऊन काय केलं? पार्लमेंटमध्ये जाऊन फक्त 40 सेकंद तुम्ही बोलला आहात. दादांना न्याय देण्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट नाही मग कशाला या विषयामध्ये जाता? असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.’

Follow Us