मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी करण्यापेक्षा…; रोहित पवारांनी सोलापुरातून सरकारकडे केली मोठी मागणी

रोहित पवारांनी सोलापुरातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी पोहोचले. तिथे जाऊन रोहित पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. तसेच त्यांनी सरकारकडे मोठी मागणी केली.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी करण्यापेक्षा...; रोहित पवारांनी सोलापुरातून सरकारकडे केली मोठी मागणी
rohit pawar news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 08, 2026 | 10:30 AM

आमदार रोहित पवार यांनी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावात नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली. त्यांनी  एका छोट्या कुटुंबात जाऊन दिवाळी साजरी केली. त्यांनी यावेळी 2 विधवा महिलांना साडी चोळी देत दिवाळी साजरी केली. या गावात पोहोचल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवरून रोहित पवारांनी सरकारकडे मोठी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीसांनी घरात दिवाळी साजरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मदत द्या, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

रोहित पवार यांनी म्हटलं की, मी या कुटुंबीयांशी बोलताना आम्ही सर्व जण भावुक झालो. कारण, त्यांच्याकडे तीन एकर जमीन आहे. त्यांनी दोन एकरात लावलेला ऊस जळाला. ऊसासाठी दीड ते दोन लाखांचा खर्च केला. हा सर्व खर्च पाण्यात गेला. त्यांच्या अर्ध्या एकरात मिरची आहे. या पिकासाठी त्यांनी त्यांच्याकडील जनावरे, म्हणजे एका लाखाची म्हैस त्यांनी 40 हजारात विकली. 80 हजारांची गाई ही 35 हजारात विकली. यातून जो खर्च आला, तो मिरची पिकाला जगवण्यासाठी खर्च केला. त्यांनी दिवसाला 1500 रुपये खर्च केले. त्यातूनही फारसा पैसा आला नाही. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. मुलाने बहिणी शिकाव्यात, यासाठी शिक्षण सोडलं. मुलींना शिकायचं आहे, परंतु त्यांच्याकडे पैसे नाहीत. फार वाईट परिस्थिती आहे. त्यातही त्यांची कर्जमाफी झाली नाही’.

Loading...

‘बँकेने तगादा लावला. सावकराकडून पैसे घेतले. आता सावकार मागे लागला आहे. त्यामुळे हा शेतकरी वेगळ्या अडचणीत सापडला आहे. यातून बाहेर पडायचं कसं, असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे.  शेत मजुरासमोरही मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्याच्या शेतात पीक नसेल, तर आम्ही जगायचं कसं…आता आमची सरकारला मागणी आहे की, तुम्ही शेतकर्‍याच्या घरी जाऊन दिवाळी करा किंवा नका करू. त्यापेक्षा एसी, मंत्रालयात जाऊन एक लाख रुपये प्रति हेक्टर मदत द्या. शेतमजुराला 25 हजारांची मदत द्या. महिलांनी मायक्रो फायनान्समधून कर्ज घेतलं, ते परतफेड करता येत नाही. आता या कर्जावर 40 टक्के व्याज आहे. आता सरकारने याची जबाबदारी घ्यावी. जेव्हा त्यांच्याकडे पैसे येतील, तेव्हा पैसे परत करतील. परंतु पैशांचा तगादा लावू नये. मुलांच्या शिक्षणाचा विषय आहे. जनावारांना चारा छावणी झालेली नाही. पाणी देखील सुरू करा, असे रोहित पवार पुढे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us