
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत अनेक हादरवणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. या भोंदू अशोक खरात याचे एक एक कारनामे समोर येत आहेत. दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचे या भोंदू बाबासोबतचे काही फोटो समोर आले आहेत, तसेच पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला. त्यामुळे चाकणकर या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, असे आदेश काढल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता रुपाली चाकणकर यांचं पहिलं ट्विट समोर आलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या चाकणकर?
‘आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले.’ असं चाकणकर यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता… pic.twitter.com/ogoLtBJFfE
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 20, 2026
दरम्यान आपल्या या ट्विटसोबत त्यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना दिलेलं एक दोन पानांचं पत्र देखील जोडलं आहे. या पत्रामध्ये चाकणकर यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी- आरोपीचे समाजातील विविध स्तरांतील लोकांशी असलेले संबंध पहाता, तपासावर कोणताही राजकीय किंवा बाह्य दबाव येणार नाही याची दक्षता घेऊन स्थपित व विशेष तपास पथक एसआयटी ने निपक्षपातीपणे तपास करावा.
पीडितेचे संरक्षण – सापडलेल्या 58 व्हिडीओंमधील पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घेण्यात यावे आणि त्यांना आवश्यक पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.
कठोर कायदेशीर कारवाई – आरोपीने जर डिजिटल पुरावे (व्हिडीओ) ब्लॅकमेलिंगसाठी वापरले असतील तर त्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत वाढीव कलमे लावून कडक कारवाई करण्यात यावी.
कालबद्ध तपास – सदर प्रकरणाचा तपास ठराविक कालमर्यादेत पूर्ण करून दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात यावे, पीडित महिलांना न्याय मिळेल.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणाचा प्रगती अहवाल वेळोवेळी आयोगाला सादर करण्यास पोलीस आयुक्त नाशिक यांना कळवावे ही विनंती असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.