AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवक्तेपदावरून डच्चू मिळताच रुपाली पाटील कडाडल्या, थेट संघर्षाचा इशारा, म्हणाल्या छाताडावर पाय रोवून….

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या प्रवक्तेपदावरून रुपाली पाटील ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वगळले आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रुपाली पाटील ठोंबरेंनी फेसबुक पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

प्रवक्तेपदावरून डच्चू मिळताच रुपाली पाटील कडाडल्या, थेट संघर्षाचा इशारा, म्हणाल्या छाताडावर पाय रोवून....
rupali thombare patil
| Updated on: Nov 18, 2025 | 7:42 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या प्रवक्तेपदावरून रुपाली पाटील ठोंबरे आणि आमदार अमोल मिटकरी यांना वगळण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. यावेळी त्यांनी पक्षातील कथित अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा आणि गरज पडल्यास संघर्ष करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय घडलं?

रुपाली पाटील ठोंबरे यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यामागे वारंवार पक्षविरोधी विधाने करणे हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. साताऱ्याच्या फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या कथित आत्महत्याप्रकरणात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात रान पेटवले होते. यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. याच वादाच्या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिले होते. पण ही भेट होऊन काही तास उलटत नाही तोच त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

या घटनेनतंर लगेचच रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक पोस्ट शेअर केली होती. नमस्कार जय महाराष्ट्र, मी आज पुण्याच्या बाहेर आहे,प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे.त्यात माझ्यासह आमदार श्री.अमोल भाऊ मिटकरी,सौ.वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत.या यादी बद्दल मा.अजितदादाना भेटून बोलून या विषयी माहिती घेईल मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले होते.

यानंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक जाहीर फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी थेट पक्षातील व्यवस्थेवर टीका केली आहे. तसेच त्यांनी संघर्ष करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

शेतकरीकन्या डॉ. संपदा मुंडे यांना न्याय न देता, त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला. या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार. माझा आवाज दाबला जाईल? प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे. आपला इतिहास हा अन्याय सहन करणार्‍यांचा नाही; गरज पडली तर ‘ख्वाडा’ करणार्‍यांचा आहे,” असा इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे.

त्यांच्या या इशाऱ्यानंतर पुढे काय घडणार याबद्दलच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व घटनांमध्ये मारहाण प्रकरणात वादात सापडल्यामुळे यापूर्वी पद गमावलेले सूरज चव्हाण यांना अजित पवारांनी पुन्हा एकदा प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत संधी दिली आहे.

Follow Us
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश