
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला आहे. कोरानाच्या सावटाखाली सोहळा पार पडतोय त्यामुळले दरवर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक हे देहू नगरीत दाखल होत असतात मात्र यावर्षी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पायी साध्या पद्धतीनं 336 व्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालंं आहे. यावेळी संभाजीराजेंच्या हस्ते तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन करण्यात आलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पालखीसोबत पंढरपुरात फक्त 2 जणांना प्रवेश मिळणार आहे. शिवाय मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे आणि यात 40 जण सहभागी होऊ शकणार आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.

तर संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान देखील झालं आहे.

एकनाथ महाराजांच्या पादुकांचं पंढरपूर वारीसाठी आज दुपारी 12 च्या सुमारास प्रस्थान झालं.

प्रस्थान कार्यक्रमासाठी 50 वारकऱ्यांना परवानगी मिळाली होती. गावातील नाथ मंदिरातून समाधी मंदिरात पालखीचे प्रस्थान करण्यात आलं.

18 दिवास नाथ महाराजांच्या समाधी मंदिरात पालखीचं मुक्काम असेल त्यानंतर 19 तारखेला पालखी बसमधून पंढरपूरला जाणार आहे.