Saksham Tate Murder Case : सक्षम मर्डर प्रकणात मोठा ट्विस्ट! पोलीस अधिकाऱ्यानेच आंचलच्या भावाला….

Saksham Tate Murder Case : नांदेड येथील सक्षम चाटे मर्डरची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा सुरु आहे. आता या प्रकरणी नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आंचलच्या भावलाला एका पोलीस अधिकाऱ्याचे कनेक्शन समोर आले आहे. नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया...

Saksham Tate Murder Case : सक्षम मर्डर प्रकणात मोठा ट्विस्ट! पोलीस अधिकाऱ्यानेच आंचलच्या भावाला....
Nanded Case
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 01, 2025 | 4:01 PM

आंतरजातीय प्रेम प्रकरणातून महाराष्ट्रातील नांदेडमध्ये सक्षम ताटे या तरुणाचा खून झाला. हा खून त्याची प्रेयसी आंचल मामीडवारच्या वडील आणि भावांनी मिळून केला. त्यानंतरही आंचलने हार मानली नाही. तिने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केले. सध्या हे प्रकरण संपूर्ण राज्यात चांगलेच गाजत आहे. दरम्यान, या प्रकरणातील धक्कादायक माहिती आंचलने दिली आहे. या प्रकरणाशी एका पोलीस अधिकाऱ्याचे कनेक्शन समोर आले आहे.

पोलीस अधिकाऱ्याचे कनेक्शन

आंचलने प्रियकर सक्षमच्या हत्येनंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आंचन म्हणाली, “27 तारखेला घटनेच्या दिवशी सकाळी लहान भाऊ म्हणाला पोलीस स्टेशनला चल सक्षमवर गुन्हा दाखल कर. सक्षम विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बळजबरी करत होता. मात्र मी तक्रार दिली नाही. सर्व पोलिसांसमोर सांगितलं मला सक्षमवर गुन्हा दाखल करायचा नाही. तेव्हा पोलीस कर्मचारी धीरज कोमलवार माझ्या लहान भावाला म्हणाले, रोज मारामाऱ्या करून इथे येतोस. तुझ्या बहिणीचे लफडं ज्याच्या सोबत आहे त्याला मारून ये. असं बोलून त्या कर्मचाऱ्याने माझ्या भावाला भडकवलं.”

नेमकं काय घडलं?

पुढे आंचल म्हणाली, “माझा भाऊ बोलला त्याला मरूनच इथे येतो. त्या दिवशी संध्याकाळी मला सांगितले देव दर्शनाला जायचे आहे. मला घेऊन परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आईच्या माहेरी नेले. त्यावेळी वडील आणि दोन भाऊ सोबत नव्हते. आई आणि काका काकू होते. आम्ही मानवतला थांबलो. तिथे पोलीस आले आणि तिथे दोन्हीं भाऊ, वडील पण होते. मला आश्चर्य वाटले दोन्ही भाऊ आणि वडील का आले? मला सांगितले सक्षमला दोन तीन टाके लागले आहेत, तो रुग्णालयात आहे. तिथून पोलिसांनी नांदेडला आणले. पोलिसांनी सुद्धा मला काहीच सांगितलं नाही. पोलीस स्थानकात सकाळी सक्षमचा मयत असलेला फोटो पाहिला. तेव्हा मला कळलं.”

गुणरत्न सदावर्ते यांची पोलिसावर कारवाई करण्याची मागणी

वकील गुरुरत्न सदावर्ते यांनी सक्षम ताटेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतल आंचल मामीडवार हीला धीर दिला. सक्षमची हत्या जगात दखल घेणारी आहे. सक्षमची हत्या करण्यासाठी प्रावृत्त करणाऱ्या पोलिसावर कारवाईची झाली पाहिजे अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तसेच त्यांनी सक्षमचे आई-वडील आणि आंचलला पोलीस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.