AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांचे आरोप बिनबुडाचे… Re-NEET निकालात घोळाचा दावा करणाऱ्या याचिकाकर्त्यांना दणका, चार विद्यार्थ्यांना हायकोर्टाने ठोठावला दंड

High Court on Re-NEET Exam Result: 'नीट' वरून देश ढवळून निघाला. कालच संसदेत सार्वजनिक परीक्षा (दुरुस्ती) विधेयक मंजूर झाले. तर नीट पुनर्परीक्षेवर आक्षेप घेणाऱ्या चार याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीच्या माहिती आधारे केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि दंड ठोठावला.

विद्यार्थ्यांचे आरोप बिनबुडाचे... Re-NEET निकालात घोळाचा दावा करणाऱ्या याचिकाकर्त्यांना दणका, चार विद्यार्थ्यांना हायकोर्टाने ठोठावला दंड
री-नीटविरोधातील चारही याचिका फेटाळल्या
| Updated on: Jul 31, 2026 | 11:25 AM
Share

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) नीट पेपरफुटीनंतर पुनर्परिक्षा घेतली. री-नटीच्या गुणपत्रात फेरफार आणि निकालात त्रुटी असल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर सुनावणीनंतर याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि चुकीच्या माहिती आधारे केल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने सर्व याचिका फेटाळल्या. न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने चारही याचिकाकर्त्यांना प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंडात्मक खर्च(Cost) ठोठावला. या विद्यार्थ्यांनी निकालाविरोधात थेट खंडपीठात धाव घेतली होती. केंद्र सरकार आणि NTA ला प्रतिवादी करण्यात आले होते. खंडपीठाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत या विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तर पत्रिका सीलबंद पाकिटात दिल्लीहून मागवून घेतल्या होत्या. केंद्र सरकार आणि एनटीएची बाजू डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया ॲड.अजय तल्हार यांनी मांडली. वरिष्ठ पॅनल कौन्सिल ॲड. रोहित सर्वज्ञ यांनी युक्तिवाद केला.

उत्तरपत्रिका तपासल्यानंतर न्यायालयाने याचिका फेटाळल्या

नीट निकालानंतर गुणांमध्ये तफावत असल्याचा आरोप चार विद्यार्थ्यांनी केला होता. याचिकाकर्ते ऋचा देशपांडे, सोहम गवते, अथर्व जगताप आणि राहुल नाग यांनी दावा केला की, त्यांच्याकडील ओएमआर शीट आणि अधिकृत उत्तरतालिकेनुसार मिळणारे गुण आणि एनटीएने जाहीर केलेले स्कोअरकार्डमधील गुणांमध्ये मोठी तफावत आहे.

सुनावणीदरम्यान दोन्ही न्यायमूर्तींनी सीलबंद पाकिटं उघडली. मूळ उत्तर पत्रिकांची पाहणी केली. संबंधित विद्यार्थी, त्यांचे पालक आणि वकिलांना या उत्तरपत्रिका दाखवल्या. NTA ने विद्यार्थ्यांना दिलेले गुण आणि मूळ उत्तरपत्रिकेतील उत्तरं तंतोतंत जुळत असल्याचे या तपासणीत उघड झाले. निकाल पूर्णपणे अचूक असल्याचे समोर आले. एनटीएच्या निकालात कोणतीही चूक अथवा फेरफार झाली नसल्याचे उघड झाले. उत्तरपत्रिकेतील उत्तरानुसारच गुणांकन केल्याचे उघड झाले. तर विद्यार्थ्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे न्यायालयाने म्हटले.

याचिकाकर्त्यांना 5 हजारांचा दंड

Re-NEET परीक्षेच्या निकालात गडबड झाल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेल्या चारही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाने याचिकांमधील दावे बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचे नमूद करत प्रत्येक याचिकाकर्त्यावर ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. निकालावर संशय व्यक्त करणाऱ्या याचिकांमुळे न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया गेल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात सरकार आणि एनटीएच्या वतीने बाजू मांडणारे ॲड. रोहित सर्वज्ञ यांनी न्यायालयातील युक्तिवाद आणि निकालाबाबत सविस्तर माहिती दिली.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा