AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांची खाकी वर्दी रक्ताने माखलेली… CJP आंदोलनादरम्यान जखमी पोलिसांच्या कुटुंबियांनी सांगितली अंगावर काटा आणणारी आपबिती

CJP Protest Police Personnel Family : CJP आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिस दलातील जखमी उपनिरीक्षकच्या मुलीने आणि इतरांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यानची आपबित्ती सांगितली. 25 जुलै रोजी जमावाने तिच्या वडिलांना खेचत मारहाण करून अर्धमेले केल्याचा दावा या मुलीने केला. जखमी पोलिसांच्या कुटुंबियांनी दिल्लीत त्यांची बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

त्यांची खाकी वर्दी रक्ताने माखलेली... CJP आंदोलनादरम्यान जखमी पोलिसांच्या कुटुंबियांनी सांगितली अंगावर काटा आणणारी आपबिती
जखमी पोलिसांच्या कुटुंबियांची पत्र परिषद
| Updated on: Jul 31, 2026 | 11:04 AM
Share

UG-NEET पेपरफुटीविरोधात, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने शांततापूर्ण आंदोलन केले. 20 जुलै रोजी आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला. आंदोलनात काही असामाजिक तत्व घुसून दगडफेक करत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. दरम्यान पोलिसांवर अणकुचीदार दगड आणि काचेच्या बाटल्यांचा मारा करण्यात आल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. यासंबंधी दिल्ली पोलिसांच्या कुटुंबियांनी थोड्या वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात संसदेवरील मोर्चादरम्यान हिंसक घटना घडली आणि त्यावर गंभीर जखमी पोलिसांच्या कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली आणि त्यांच्या भावना मांडल्या.

कुटुंबियांनी व्यक्त केल्या भावना

पत्रकार परिषदेदरम्यान जखमी पोलिसांचे कुटुंबिय भावूक झालेले दिसले. त्यातील एका मुलीने कुटुंबियांची आपबिती सांगितली. त्या दिवशी जेव्हा वडील काम संपवून घरी आले, तेव्हा त्यांचा पोलीस गणवेश, खाकी वर्दी रक्ताने माखलेली होती. डोके आणि दोन्ही हातांना गंभीर जखम झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला. दिल्ली पोलिस दलातील सहायक पोलीस आयुक्तांची पत्नी अवनीत कौर यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. 20 जुलै रोजी रात्री पती गंभीर जखमी अवस्थेत घरी पोहचले. त्यांना पाहून माझे हातपाय लटलटले. माझ्यासाठी आणि दोन वर्षाच्या आमच्या मुलीसाठी हा प्रसंग भीतीदायक होता. माझी लहान मुलगी वडिलांना त्या स्थितीत पाहून भेदरलेली होती.

त्यांचा गणवेश रक्ताने माखलेला

आंदोलनास्थळी घडलेल्या हिंसक घटनेवर संताप व्यक्त करत अवनीत कौर यांनी लोक हे विसरतात की एक पोलीस अधिकारी हा एकटा व्यक्ती नसतो. तर त्याच्या पाठीमागे एक कुटुंब असते. त्याची पत्नी, लहान मुलं आणि वयोवृद्ध आई-वडील असतात. सर्वच जण तो सुरक्षित घरी परतावा याची वाट पाहत असतात. तर एका उपनिरीक्षकाच्या मुलीने सांगितले की, पोलीस दलात भरती होण्यापूर्वी तिचे वडील हे भारतीय नौसेनेत मरीन कमांडो होते. त्यांनी आयुष्यातील 15 वर्षे ही भारतीय नौदलात खर्ची घातली. त्यादिवशी वडील आंदोलनस्थळी बॅरिकेट्सजवळ तैनात होते. तिथे मोठा जमाव जमला होता. आंदोलनादरम्यान वडिलांनी अनेकदा घरी सांगितले होते की आता हे केवळ विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिलेले नाही. तर या आंदोलनात काही असामाजिक तत्व घुसले आहेत, असे उपनिरीक्षकाच्या मुलीने सांगितले. 25 जुलै रोजी जमावाने तिच्या वडिलांना खेचत मारहाण करून अर्धमेले केल्याचा दावा या मुलीने केला. चार तास ते घटनास्थळीच बेशुद्ध पडलेले होते. नंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना उचलून घरी आणले. त्यांचा गणवेश रक्ताने माखलेला होता. वडील रुग्णालयात उपचार घेत असताना सोशल मीडियावर मात्र त्यांना अपराधी आणि गुन्हेगार ठरवण्यात आल्याचे दुःख त्या मुलीने व्यक्त केले.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा