डीजेचा दणदणाट भोवला; मराठवाड्यातील या शहरात 250 रुग्ण दवाखान्यात

| Updated on: Apr 16, 2024 | 5:52 PM

DJ Patients : सध्या सर्वदूर डीजेचा फॅड वाढलं आहे. लग्न कार्य असो वा महापुरुषांची जयंती, त्यात तरुणाईचा डीजेसाठी मोठा आग्रह असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक शहरात डीजे वाजला. पण या दणदणाटाचा आणि गोंगाटाचा अनेक तरुणांसह अबालवृद्धांना मोठा फटका बसला.

डीजेचा दणदणाट भोवला; मराठवाड्यातील या शहरात 250 रुग्ण दवाखान्यात
कानात शिट्या, गुंई आवाज, डीजेचा भोवला दणदणाट
Image Credit source: संग्रहित छायाचित्र
Follow us on

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशातील अनेक भागात उत्साहाचे वातावरण होते. तरुणांसह अबालवृद्ध मिरवणुकीत थिरकले. भीमोत्सवाला उधाण आले होते. महाराष्ट्रात जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. पण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये डीजेचा हा दणदणाट भोवला. डीजेच्या समोर नाचणाऱ्या अनेक तरुणांना डीजेच्या दणदणाटाने रुग्णालाय, दवाखान जवळ करावा लागला. त्यांना कानात शिट्यांचा आवाज आणि गुंई असे ऐकू यायला लागेल. तर काहींचे डोके सुन्न पडले. रविवारी सायंकाळी कानाचा त्रास वाढल्याने शहरातील 70 रुग्णालयांत 250 रुग्ण दाखल झाले.

पुण्याहून बोलव माझ्या डीजेला

14 एप्रिल रोजी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अभुतपूर्व उत्साह दिसला. क्रांती चौकात तर जणू तरुणाईचा सागर उसळला होता. पुण्याहून 15 डीजे शहरात बोलविण्यात आले होते. कानठळ्या बसविणाऱ्या डीजेसमोर तरुणाई थिरकली. या डीजेंचा आवाज जवळपास 150 डेसिबलपर्यंत गेला होता.

हे सुद्धा वाचा

या वयोगटाला मोठा फटका

डीजेच्या दणदणाटाने अनेक तरुणांसह अबालवद्धांच्या कानात शिटी वाजल्याचा आणि गुंई असा आवाज घुमत होता. त्यांना तातडीने नाक-कान-घसा तज्ज्ञांकडे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रविवारी रात्री आणि सोमवारी संध्याकाळपर्यंत 70 रुग्णालयांत 250 रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामध्ये 17-40 वयोगटातील रुग्णांचा सर्वाधिक समावेश असल्याचे समोर आले आहे.

तातडीने उपचार घ्या

डीजेमुळे कानाचा त्रास जाणवत असल्यास. शिट्टी वाजल्याचा अथवा इतर काही आवाज घुमत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा इशारा शहरातील नाक-कान-घसा तज्ज्ञांनी दिला आहे. यावर तातडीने उपचार सुरु करणे गरजेचे आहे. हा आवाज असाच राहिल्यास 72 तासांच्या आता उपचार न घेतल्यास बहिरेपणा येण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

तीन मंडळांवर गुन्हे दाखल

मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवल्याने तीन मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्रांती चौक पोलिसांनी ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणात भारतीय दंड विधानासह पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण कायद्यातंर्गत तीन मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत.