AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीच्या धामधुमीत मोठं आक्रीत, अजितदादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न, अंबादास दानवेंचा कुणावर आरोप?

Ajit Pawar NCP Office : निवडणुकीच्या धामधुमीत आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. अगदी पातळीसोडून भाषा वापरण्यात येत आहे. काही हिंसक घटनाही समोर आल्या आहेत. सोलापूरात एक खून झाला आहे. तर आता छत्रपती संभाजीनगरमधील कैलासनगरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत मोठं आक्रीत, अजितदादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न, अंबादास दानवेंचा कुणावर आरोप?
छत्रपती संभाजीनगर येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्नImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 07, 2026 | 2:57 PM
Share

Chhatrapati Sambhajinagar: निवडणुकीच्या धामधुमीत छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं आक्रीत घडलं आहे. प्रचाराला वेग आलेला असतानाच छत्रपती संभाजी नगर मध्ये दादाच्या राष्ट्रवादीचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रभाग क्रमांक 16 मधील कैलास नगर मधील कार्यालय अज्ञात व्यक्तीकडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. राष्ट्रवादीकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसात तक्रार देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी दिली आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून असे प्रकार घडत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

आज भल्यापहाटे घडला प्रकार

आज भल्या पहाटे 4=5 वाजेदरम्यान हा प्रकार घडला. एक लाल टीशर्ट घातलेला इसम या ठिकाणी आला. त्याने कार्यालयाबाहेरील पडद्याला आग लावली. त्यानंतर त्यानं सिगारेट शिलगावात आरामात तिथून पळ काढला. दरम्यान या ठिकाणी आग लागली होती. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी कार्यकर्त्यांना उठवलं आणि आग लागल्याची माहिती दिली. जातीपातीच्या राजकारणाला आम्ही थारा देत नाही. विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही उपलब्ध करून देत पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवल्याचे ष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख म्हणाले.

आग लावणारा कोण?

दरम्यान याप्रकरणात उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकाराचा निषेध केला. सीसीटीव्ही फुटेज वरून संपूर्ण चौकशी पोलीस प्रशासन करेल.चौकशीत जो कोणी त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.आज आम्हाला नक्की सांगता येत नाही तो पण कोणत्या पक्षाचा आहे.आमच्या चारही उमेदवारांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे. त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे समोरच्या पार्टीकडे राहिले नाहीत. याची संपूर्ण चौकशी पोलीस कमिशनर करतील, जो कोणी असेल कोणत्याही पक्षाचा असेल, तो भाजपाचा असेल सेनेचा असेल राष्ट्रवादीचा असेल त्याच्यावर कारवाई होईल.आमच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणे सुरू आहे. मात्र आमच्या कार्यकर्ते अजून जोमाने कामाला लागतील, असे दानवे म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...