क्रांती रेडकरच्या बहिणीची पोलिसात धाव, ड्रग्ज व्यवसायात असल्याच्या आरोपानंतर नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार

अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. हर्षदा रेडकर या ड्रग्ज व्यवसायात असल्याचं मलिक यांनी म्हटलयं. मात्र आता क्रांती रेडकर यांच्या बहिणीच्या वकिलाने गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली आहे.

क्रांती रेडकरच्या बहिणीची पोलिसात धाव, ड्रग्ज व्यवसायात असल्याच्या आरोपानंतर नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार
SAMEER WANKHEDE AND KRANTI REDKAR
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 11:23 PM

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मेहुणी तसेच अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. हर्षदा रेडकर या ड्रग्ज व्यवसायात असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. मात्र आता क्रांती रेडकर यांच्या बहिणीच्या वकिलाने गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली आहे.

गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल

नवाब मलिक यांनी क्रांती रेडकरच्या बहिणीचे नाव घेऊन एका प्रकरणाबाबत ट्विट केले होते. या ट्विटमध्ये हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? असा सवाल करण्यात आला होता. या ट्विटनंतर आता हर्षदा रेडकर यांनी कठोर कारवाई करण्याचा पवित्रा घेतलाय. त्यांनी आज (9 ऑक्टोबर) दुपारी गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केलीय. कलम 354, 354डी, 503 आणि 506 कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांनी केले गंभीर आरोप, ट्विटरवर केले फोटो अपलोड

मागील अनेक दिवसांपासून नवाब मलिक समीर वानखेडे, वानखेडे यांचे वकील यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. त्यांनी वानखेडे यांनी चुकीचे कागपदत्रे सादर करुन मागासवर्गीयांची नोकरी बळकावल्याचा आरोप केलेला आहे. त्यानंतर आता मलिक यांनी समीर यांच्या नातेवाईकांना लक्ष्य केलंय. त्यांनी 8 ऑक्टोबर रोजी एक ट्विट केलंय. त्या ट्विटसोबत त्यांनी काही स्क्रीनशॉटसुद्धा प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात असल्याचा दावा केलाय.

नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ?

समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा, असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे म्हणून सादर केले आहेत.

इतर बातम्या :

समीर वानखेडेंच्या कुटुंबीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला, सत्याचा विजय नक्की होईल- क्रांती रेडकर

महाराष्ट्राला 6 पद्म पुरस्कार प्रदान, रजनीकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण

SpaceX : 200 दिवसांची अंतराळ मोहीम पुर्ण करून चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले, बघा VIDEO

(Sameer Wankhede your sister in law Harshada Dinanath Redkar file case against nawab malik)