Vastu Shastra : जर तुम्हालाही भीतीदायक स्वप्न पडत असतील, तर झोपण्यापूर्वी हा उपाय नक्की करा
अनेकदा आपल्याला झोपेत भीतीदायक स्वप्न पडतात, अशी स्वप्न पडल्यामुळे आपण झोपेतून दचकून उठतो. झोपेतून मधूनच उठल्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो. दरम्यान अशी स्वप्न पडू नये, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्र हे प्रामुख्यानं सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन गोष्टींवर कार्य करते, जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष निर्माण झाल्यास तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. तुम्ही कितीही पैसा कमाववा तरी तो हातात टिकत नाही, तुमच्यावर असलेलं कर्ज वाढतच जातं, एवढंच नाही तर जर घरात वास्तुदोष निर्माण झाला तर तुम्हाला अनेकदा नकारात्मक किंवा भीतीदायक स्वप्न पण पडू शकतात, सामान्यपणे तुम्ही दिवसभर जे अनुभवता, जे पहाता ते रात्री तुमच्या स्वप्नात दिसतं असं मानलं जातं, मात्र काही स्वप्न अशी देखील असतात, ती स्वप्न तुम्हाला काही विशिष्ट संकेत देण्यासाठी पडतात, अशा स्वप्नाचा आणि वास्तुशास्त्राचा जवळचा संबंध असतो. भीतीदायक स्वप्न पडू नये, यासाठी काय करावं? याची माहिती वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे.
दिशा – झोपताना कधीच दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये, वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते. आपल्या पूर्वजांची दिशा मानला जाते, त्यामुळे कधीही या दिशेला पाय करून झोपू नये, दक्षिण दिशेला डोकं आणि उत्तर दिशेला पाय करून झोपावं, ज्या प्रमाणे दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये, त्याचप्रमाणे पूर्व दिशेला पाय आणि पश्चिम दिशेला डोकं करून झोपू नये. नेहमी पूर्व पश्चिम असं झोपावं, यामुळे भीतीदायक स्वप्न पडत नाहीत, तसेच आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
मिठाची पुडी – झोपताना तुम्ही जर तुमच्या उशिखाली मिठाची पुडी ठेवली तरी देखील तुम्हाला जी वाईट स्वप्न पडतात ती पडत नाहीत, सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तिपासून तुमचं संरक्षण होतं असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, झोपताना आपल्या इष्ट देवतेचा जप केल्यास देखील शांत झोप लागते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
