शिवसेना वाघाची अवलाद, सांगलीत कुणी कोंडी केली तर…; संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा

| Updated on: Apr 06, 2024 | 1:59 PM

Sanjay Raut on Vishal Patil Congress Chandrahar Patil Loksabha Election 2024 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं सांगलीत दमदार भाषण... काँग्रेसला इशारा देताना म्हणाले, आम्ही वाघाची अवलाद, सांगलीत कुणी कोंडी केली तर... राऊतांचा काँग्रेसला इशारा काय? वाचा सविस्तर...

शिवसेना वाघाची अवलाद, सांगलीत कुणी कोंडी केली तर...; संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा
Follow us on

सांगलीतील तासगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित आहेत. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघडीत तेढ कायम आहे. यावर संजय राऊतांनी भाष्य केलं. शिवसेना वाघाची अवलाद आहे. जर राजकारण करून चंद्राहार पाटलांची कोणी कोंडी करत असेल तर गप्प बसणार नाही. ज्यांना भाजपला मदत करायचे आहेत. त्यांनी करावी पण आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा संजय राऊतांनी काँग्रेसला दिला आहे. सांगलीच्या जागेवर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दावा केला आहे. त्याला राऊतांनी सभेतून उत्तर दिलं आहे.

सांगलीच्या जागेवर संजय राऊतांचं भाष्य

उन्हामुळे वातावरण तापले आहे. तर हळूहळू राजकारण ही तापेल आणि जसजशी शिवसेना पुढे जाताना दिसेल. तसे आपल्या विरोधकांची डोकी तापतील. ते आत्ताच तापलेले ही दिसतायेत. लोकांना आश्चर्य वाटत आहे की, सांगलीमध्ये शिवसेना लोकसभा लढवत आहे. अनेक काँग्रेस नेत्याने वाटतं आहे की, ही मक्तेदारी आपल्याकडे हवी. या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.सामान्य माणसाला, शेतकऱ्याच्या मुलाला राजकारणात आणायचं, संधी द्यायची, अशी भूमिका त्यांची आहे, असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेस- राष्ट्रवादीला काय आवाहन?

नरेंद्र मोदी कधी समोर आला तर लोक रस्त्यावर जोडे मारतील. अशी परिस्थिती आहे. हा देश गुलाम करून टाकला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलं आहे. तुमची नोटंकी बंद करा आणि सामील व्हा… नाहीतर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. चंद्रहार पाटील यांना या मतदारसंघात प्रामाणिकपणाने मदत करा आणि मोठ्या संख्येने मेहनत करून त्यांना निवडून द्या, असं संजय राऊत म्हणाले.

नारायण राणे, एकनाथ शिंदे, मनोहर जोशी कोण रिक्षा चालवयचं, कोण काय करायचं. या सर्वांना शिवसेनेने मोठं पद दिलं. पण आता याच मोठ्या लोकांची मक्तेदारी शिवसेनेने मोडीत काढली आहे. मोदी म्हणतात 400 पार, पण तुम्ही 400 पार नाही तर 200 सुद्धा होणार नाही. मोदी गुजरातमधून हरतील. ते देशाला 200 वर्षांच्या मागे घेऊन हे लोक चाललेत. त्यामुळे आम्हाला ताकत द्या. कोण काय बोलतंय यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं आवाहन संजय राऊत यांनी सांगलीकरांना केलं आहे.