AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा बँक निवडणुकीचा अर्ज भरताना पडळकरांचं शक्तिप्रदर्शन; फटाक्यांच्या आतषबाजीवरून विरोधक आक्रमक

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी अर्जावेळी झालेल्या शक्तिप्रदर्शनावरून वाद पेटला आहे. दुष्काळाच्या तीव्र परिस्थितीत फटाकेबाजी व वाहनांचा ताफा पाहून विरोधकांनी पडळकरांवर टीका केली. मोठे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन असताना हा प्रकार घडल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

जिल्हा बँक निवडणुकीचा अर्ज भरताना पडळकरांचं शक्तिप्रदर्शन; फटाक्यांच्या आतषबाजीवरून विरोधक आक्रमक
| Updated on: Oct 01, 2026 | 5:47 PM
Share

शंकर देवकुळे, रिपोर्टर :  सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अर्ज दाखल करताना पडळकर समर्थकांकडून करण्यात आलेले शक्तिप्रदर्शन, फटाक्यांची आतषबाजी आणि वाहनांच्या ताफ्यामुळे आता राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. एकीकडे सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्र परिस्थिती असल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या या शक्तिप्रदर्शनावरून विरोधकांनी पडळकरांना लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठे कार्यक्रम आणि उधळपट्टी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं असतानाच हा प्रकार घडल्याने त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. यावरून बरीच टीका करण्यात आली.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. आलिशान वाहनांचा ताफा, फटाक्यांची आतषबाजी, कार्यकर्त्यांची गर्दी आणि घोषणाबाजी यामुळे अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम चर्चेत आला. मात्र, याचवेळी सांगली जिल्ह्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा मुद्दा पुढे करत पडळकरांच्या शक्तिप्रदर्शनावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.

दुष्काळी परिस्थिती असूनही शक्तीप्रदर्शन केल्याने टीकास्त्र

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. जत ,कवठेमहांकाळ आटपाडी मिरज तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर देखील केले आहे. खुद्द पडळकरांच्या जत तालुक्यात तर भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र अशी परिस्थिती असतानाही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्ज करताना जो डामडौल केला, तो आता चर्चेचा आणि टीकेचा विषय बनला आहे. त्यांच्या शक्तीप्रदर्शनावरू टीकेची झोड उठली आहे.

जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी टीका केली. ‘ही महाराष्ट्रची संस्कृती नाही, तुम्ही जत मधील आमदार आहात,जत तालुक्यात दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत आलिशान वाहनांचा ताफा आणि फटाक्यांची आतषबाजी करणं योग्य नाही ‘ असं त्यांनी म्हटलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनीही पडळकरांवर निशाणा साधला. ‘ गोपीचंद पडळकरांना दुष्काळाचं गांभीर्य नाही, याला बालिश पणा म्हणावा लागेल’, अशा शब्दांत नायकवडी यांनी टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, एवढी टीका झाल्यावर आता पडळकरांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याकडे फटाके उडवण्यासाठी पैसे असल्याचं म्हणत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

एकीकडे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्य दुष्काळाच्या भीषण सावटाखाली होरपळतोय. या पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी ‘मोठे कार्यक्रम करू नका,उधळपट्टी टाळा, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करा’, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. मात्र असं असलं तरी, खुद्द मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि दुष्काळी आमदार म्हणून ओळख असणाऱ्या गोपीचंद पडळकरांनीच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, दुष्काळग्रस्तांची चेष्टा केली, अशी चर्चा सर्व्त्र रंगरली आहे.

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत