मोठा भाऊ म्हणून महापालिका निवडणुकीत जास्त जागांची मागणी करण्याचा अधिकार – संजय केनेकर

"छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आमच्या काही राजकीय व्युव्ह रचना चुकल्या आहेत. परंतु आमच्या मित्र पक्षाला त्या व्यवहाराचना घडवून आणता आल्या. जिल्ह्यात आमच्या जागा गेल्या त्या मुस्लिम मतांच्या परिवर्तनामुळे गेल्या" असं संजय केनेकर म्हणाले.

मोठा भाऊ म्हणून महापालिका निवडणुकीत जास्त जागांची मागणी करण्याचा अधिकार - संजय केनेकर
BJP Flag
| Updated on: Dec 21, 2025 | 5:41 PM

“राज्यात जो विजय मिळाला आहे, तो महायुतीचे कॅप्टन देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कमळाच्या चिन्हामुळे मिळाला आहे. या पीचवर नागरिकांनी चौके आणि छक्के मारले आणि विरोधकांना पळवून लावले. पुढे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आहेत आणि ये तो सिर्फ झाकी है ,महापालिका और जिल्हा परिषद बाकी है. राज्यात मैत्री पूर्ण लढत झाल्या. पण कमळ पिच वापरले असते तर चित्र वेगळे असते” असं संजय केनेकर म्हणाले. “राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅप्टन आहेत आणि त्यांच्यावर नागरिकांनी जो विश्वास दाखवला, त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्हाला मोठा भाऊ म्हणून महापालिका निवडणुकीत जास्त जागांची मागणी करण्याचा अधिकार आहे” असं संजय केनेकर यांनी सांगितलं.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आमच्या काही राजकीय व्युव्ह रचना चुकल्या आहेत. परंतु आमच्या मित्र पक्षाला त्या व्यवहाराचना घडवून आणता आल्या. जिल्ह्यात आमच्या जागा गेल्या त्या मुस्लिम मतांच्या परिवर्तनामुळे गेल्या. मुस्लिम मतांची मतांची साटगाठ केल्यामुळे काही जागा मित्रपक्ष आणि विरोधकांकडे गेल्या. महापालिकेत आमची माहिती करण्याची संपूर्ण तयारी आहे आणि त्या दृष्टीने व्युव्ह रचना सुरू आहे” असं त्यांनी सांगितलं.

त्या ठिकाणी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे

“भाजपा-शिवसेनेची युती होईल असे आमचे संकेत तयार झालेले आहेत. आमची शिवसेनेसोबत मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा सुरू आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे ज्या पद्धतीने आज वातावरण आहे, याचा फायदा शिवसेनेने घेतला पाहिजे तसेच महापालिकेत काही ठिकाणी आपल्याला भाजपच्या वातावरणाचा फायदा घ्यावा लागेल. ज्या ठिकाणी शिवसेनेला सीट नाही त्या ठिकाणी शिवसेनेने अडून बसू नये त्या ठिकाणी भाजपला संधी दिली पाहिजे” असं संजय केनेकर म्हणाले. “ज्या ठिकाणी शिवसेनेकडे उमेदवार नसेल त्या ठिकाणी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भरघोस यश मिळवून दिले आहे. त्याचा फायदा महानगरपालिका निवडणुकीत घेतला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर मनपात महापौर मात्र महायुतीचाच बसेल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.