Sanjay Raut : फार मोठी क्रांती झाली असं मी म्हणणार नाही, पण..संजय राऊत यांच्या नजरेतून प्रशांत किशोर यांच्या विजयाचं विश्लेषण

"महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अशा प्रकारचे अनेक गुन्हेगार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवतायत असं आम्ही वारंवार सांगतोय. भाजपं मतदारांना गृहीत धरतं. त्याचा फटका भाजपला बसला" असा राऊतांनी दावा केला.

Sanjay Raut :   फार मोठी क्रांती झाली असं मी म्हणणार नाही, पण..संजय राऊत यांच्या नजरेतून प्रशांत किशोर यांच्या विजयाचं विश्लेषण
sanjay raut
| Updated on: Aug 04, 2026 | 11:06 AM

काल तीन राज्यातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यात बांकीपूरच्या निकालाची सर्वात जास्त चर्चा आहे. कारण इथे प्रशांत किशोर यांनी भाजपचा 30 वर्षांपासूनचा बालेकिल्ला उद्धवस्त केला. या निकालांच आज संजय राऊत यांनी विश्लेषण केलं आहे. “आश्चर्य वाटावं असे हे निकाल नाहीत. बिहारमधील जी जागा बांकीपूर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि त्यांचे वडिल 1995 सालापासून ती जागा जिंकत आहेत. भाजपने ही गड असलेली त्यांची जागा प्रशांत किशोर यांच्याकडून गमावली. भाजप नेते रवीशंकर प्रसाद काय म्हणाले बांकीपूर कुत्रा, मांजर जरी भाजपने उभं केलं म्हणजे पाहा मतदारांना किती गृहित धरतात. भाजपने कुत्रा, मांजराला उभं केलं तरी लोक मतदान करतील. हा अहंकार लोकांनी मोडून काढला” असं संजय राऊत म्हणाले.

“त्यानंतर मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा काँग्रेसची होती. ती जिंकण्यासाठी भाजपने साम, दाम, दंड भेदाचा वापर केला. पण काँग्रेसने ही जागा जिंकली. भाजपने गुजरातची जागा जिंकली त्यात काही विशेष नाही. या तीन पोटनिवडणुकांचे निकाल त्यात दोन महत्वाचे आहेत. फार मोठी क्रांती झाली असं म्हणणार नाही. पण लोकांचा कल दिसतोय. मोदी किंवा भाजपची लोकप्रियता किती खाली घसरलीय हे तुमच्या बालेकिल्ल्यातल्या पराभवातून स्पष्ट दिसतय” असं राऊत म्हणाले.

त्यामुळे हा पराभव झाला

“बांकीपूरमध्ये 95 पासून असलेला गड ताब्यात आहे तो तुम्ही टिकवू शकला नाही याचा अर्थ ६४ टक्के लोकांनी आपल्याविरोधात मतदान केलय. त्यांनी एक नवीन पर्याय निवडला हे सुद्धा महत्वाचं आहे. हवा पालट होताना दिसतेय” असं राऊत म्हणाले. “तामिळनाडूमध्ये हेच झालय. डीएमके किंवा एआयडीएमके या पक्षांपेक्षा एका वेगळ्या पक्षाच्या मागे लोक गेले. प्रशांत किशोर बिहार विधानसभेत पूर्ण पराभूत झाले होते. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. त्यांनी आता बांकीपूरच्या जागेवर लक्ष केंद्रीत केलं. त्यांनी उत्तम प्रचार केला. पराभवाला जबाबदार भाजपचं लोकांना गृहीत धरणं आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी एक अशिक्षित, गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस नेमून भाजपने बिहारच्या मतदारांचा, जनतेचा अपमान केला. त्यामुळे हा पराभव झाला” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवतायत

“आम्ही कोणलाही नेमू शकतो. तेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं. एक भ्रष्ट, कॅमेऱ्मयासमोर पैसे घेणारा, त्याची खिल्ली मोदींनी उडवली. त्याला मुख्यमंत्री बनवलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अशा प्रकारचे अनेक गुन्हेगार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवतायत असं आम्ही वारंवार सांगतोय. भाजपं मतदारांना गृहीत धरतं. त्याचा फटका भाजपला बसला” असा राऊतांनी दावा केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us