AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : सिद्धिविनायक मंदिर चोरी प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचं नाव येताच राऊतांचं आश्चर्यकारक उत्तर, तेच राम मंदिर दान चोरीवर..

"संघातील नेत्याची मुलं नातवंड असतील. दुसरं कोण जाणार. भाजपं नेत्यांची पोरं, नातवंड म्हणजे जेन झी नाहीत. जेन झी म्हणजे ज्या मुलांनी जंतर-मंतरला येऊन आंदोलन केलं ते" मोहन भागवतांनी त्यांच्याशी बोलावं

Sanjay Raut : सिद्धिविनायक मंदिर चोरी प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचं नाव येताच राऊतांचं आश्चर्यकारक उत्तर, तेच राम मंदिर दान चोरीवर..
Sanjay Raut
| Updated on: Aug 04, 2026 | 10:46 AM
Share

खासदार संजय राऊत यांनी आज बांकीपूरमध्ये झालेल्या भाजपच्या पराभवाचं विश्लेषण केलं. पोटनिवडणुकांच्या या निकालामुळे काय बदलू शकतं यावर ते बोलले. राम मंदिरातील दोन चोरीचा मुद्दा लावून धरणाऱ्या राऊतांना जेव्हा सिद्धिविनायक मंदिरातील चोरीचा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. “देशात सध्या जे वातावरण आहे, मोदी, भाजपची लोकप्रियता किती घसरलीय त्याचं बांकीपूर उदहारण आहे. जी जागा तुम्ही ९५ पासून जिंकताय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची रिक्त जागा जी त्यांनी आधी ४० हजारच्या फरकाने जिंकलेली. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांची जागा जिंकू शकला नाहीत” असं राऊत बोलले.

“जंतर-मंतरवरील जेन झी च आंदोलन, राम मंदिरातील लूट त्यावर तुमचं मौन, नितीन नवीन यांच्यासमोर तुम्ही बजरंगबलीला नाचायला लावलं. हे लोकांच्या मनाला लागलं. तुम्ही हनुमानाला नाचायला लावता, जेन झी वर गोळ्या चालवता, या सगळ्या गोष्टींचा परिणाम मतदारांवर झाला. बिहारच्या जनतेच्या डीएनएमध्ये राजकारण आहे” असं संजय राऊत म्हणाले.

सिद्धिविनायक मंदिरातील चोरीवर दिलं असं उत्तर 

राम मंदिराप्रमाणे सिद्धिविनायक मंदिरात चोरीचे आरोप झालेत. सदा सरवणकर यांनी आरोप केलाय की हे सगळे कर्मचारी विशाखा राऊत यांनी नेमले होते. पत्रकारांच्या या प्रश्नावर संजय राऊत बोलले की, “ज्या गोष्टीबद्दल मला माहित नाही, त्यावर मी बोलणार नाही. हा तांत्रिक मुद्दा आहे. या विषयाच्या मी खोलात गेलेलो नाही, मला माहित नाही”

तिथूनच काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली

“पोटनिवडणुकीच्या निकालामुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढतो. आम्ही जे करतोय त्याला लोक पाठिंबा देतायत. पोटनिवडणुकीचा इतिहास बिघतला तर अलहाबाद पोटनिवडणुकीत व्ही.पी. सिंह जिंकले तिथूनच काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली. भाजपचा पोटनिवडणुकीत पराभव झाला. अशा निकालांमुळे विरोधकांचा आत्मविश्वास वाढतो” असं राऊत म्हणाले.

मोहन भागवत यांनी त्या जेन झी मुलांशी बोलावं

मोहन भागवत जेन झी शी संवाद साधणार आहेत. त्यावर राऊत म्हणाले की, “संघातील नेत्याची मुलं नातवंड असतील. दुसरं कोण जाणार. भाजपं नेत्यांची पोरं, नातवंड म्हणजे जेन झी नाहीत. जेन झी म्हणजे ज्या मुलांनी जंतर-मंतरला येऊन आंदोलन केलं. ज्या मुलांनी घोषमा दिल्या, ज्यांच्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यातील 2000 मुलांना बोलवा, त्यांच्याशी बोला” असं राऊत म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी