अमित शहा स्वत: संकटात, ते नरेंद्र मोदींना कसं वाचवणार? संजय राऊतांचा रोखठोक सवाल, कारणही सांगितलं

संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लबोल केला. संकटात सापडलेले अमित शहा हे नरेंद्र मोदींना कसं वाचवणार, असा सवाल संजय राऊतांनी केला.

अमित शहा स्वत: संकटात, ते नरेंद्र मोदींना कसं वाचवणार? संजय राऊतांचा रोखठोक सवाल, कारणही सांगितलं
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 7:56 AM

देशातील राजकारण ‘दिमागी नक्षलवादावरून तापलं आहे. छत्तीसगडमध्ये दिवाळी सणाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंगलातील नक्षलवाद संपला आहे. तर ‘दिमागी नक्षलवाद’ आता सर्व संघटनांमध्ये शिरकाव करत असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’तील मुखपत्रातील ‘रोखठोक’ सदरातून उत्तर दिलं आहे.  दिमाक्षी नक्षल  आत त्यांचे राजकीय विरोधक आहे. मोदी हे वेड घेऊन पेडगावला निघाले आहेत. मोदी ज्यांना ‘दिमागी नक्षलवादी’ म्हणताहेत,  ती लोकशाहीप्रेमी सामान्य जनता आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. आता अमित शहा स्वत: संकटात आहेत, ते नरेंद्र मोदींना कसे वाचवणार, असा सवाल देखील संजय राऊतांनी केला.

संजय राऊत यांनी देशातील महागाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले ,दिवाळीचा उत्सव संपलाय. पंतप्रधान मोदींनी सुरक्षा दलाच्या जवानांसोबत बस्तरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तिथे त्यांनी ‘दिमागी नक्षलवाद’ वगैरे संविधानासाठी धोका असल्याचे मोदी म्हणाले. आता दिमागी नक्षल म्हणजे त्यांचे राजकीय विरोधक आहेत.  मोदी ज्यांना ‘दिमागी नक्षलवादी’ म्हणत आहेत, ती लोकशाहीप्रेमी सामान्य जनता आहेत’.

Loading...

‘देशात भरमसाट महागाई वाढलीये. ती नियंत्रणाखाली आणा. बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्यात. भारताचा निवडणूक आयोग, त्यांचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार निष्पक्ष नाहीत. तर भाजपचे ‘हरकामे’ म्हणून काम करताहेत. त्यांचा राजीनामा घ्या.  त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने मतदार यादीतून साडेतेरा कोटी नावे वगळली आहेत. त्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल करावा. लोकशाही म्हणजे लोकांच्या मतदानातून निर्माण झालेली सत्ता आहे.  गेल्या दहा-बारा वर्षात मोदी, शहा, राजीवकुमार, ज्ञानेशकुमारांसारख्यांनी मतपेटीतली निकाल व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे लोकशाहीचे निकाल यापुढे रस्त्यावर लागतील. जंतरमंतर, रामलीला ते गोकुळच्या लढाईत तेच दिसले आहे, असे राऊतांनी म्हटलं.

गोकुळवरून राऊतांचा हल्लाबोल 

संजय राऊत म्हणाले, ‘कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली ‘समविचारी पॅनेल’ने बाजी मारली. भाजप महायुतीचं पॅनल पराभूत झालं. तरीही पराभूतांनाच ‘गोकुळ’ची सुत्रे देण्यासाठी चार नवे संचालक सरकारने नियुक्त केली. तर बहुमतावर दबाव आणून सत्ता मिळवली’.  त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष फोडले. तसेच  मालकी आणि चिन्ह अमित शहांचे ‘हस्तक’ असलेल्या लोकांना देऊन लोकशाहीचा खून केलाय. तसेच त्याबाबत न्याय होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टावर दबाव आणला जातोय’.

राऊतांचा सत्ताधाऱ्यांना सवाल 

संजय राऊत पुढे म्हणाले, राहुल गांधींनी दिलेले एकही आव्हान स्वीकारायला पंतप्रधान तयार नाहीए. नरेंद्र मोदी यांच्या वतीने गृहमंत्री अमित शहा बोलताहेत. अमित शहा यांचं स्वत:चेच स्थान धोक्यात आलंय. ते मोदींनी कसं वाचवणार? लोकशाहीत मतपेटीतून लावण्याची प्रथा मोदी-शहा, ज्ञानेशकुमारांनी नष्ट केलीये. आता लोकशाहीचे निकाल रस्त्यावर लागतील. जंतरमंतर ते गोकुळ..सर्व ठिकाण तसंच चित्र दिसतंय. मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांसारखे लोक किती लाख लोकांना उद्ध्वस्त करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us