‘मी पुन्हा येईन’ असं तीनवेळा म्हणालो नव्हतो; संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा

नाशिकच्या कालिदास कला मंदिर या ठिकाणी एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊतांनी टीका केली. (Sanjay Raut Criticises Devendra Fadnavis)

मी पुन्हा येईन असं तीनवेळा म्हणालो नव्हतो; संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस
| Updated on: Feb 13, 2021 | 11:42 PM

नाशिक : “मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन असे तीन वेळा म्हणालो नव्हतो, हे लक्षात घ्या,” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. यावेळी संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. नाशिकच्या कालिदास कला मंदिर या ठिकाणी एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊतांनी टीका केली. (Sanjay Raut Criticises Devendra Fadnavis)

नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथील एका कार्यक्रमात संजय राऊतांनी हजेरी लावली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि संजय राऊत यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे छगन भुजबळ आणि संजय राऊत या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघेही एकाच व्यासपीठावर हजेरी लावली.

“गेल्यावर्षी यांच्या कार्यक्रमातून मी थोडं लवकर गेलो. मी त्यावेळी नक्की येईन असे म्हणालो होतो. त्यांना वाटलं मी येणार नाही. पण मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असे तीन वेळा म्हणालो नव्हतो. हे लक्षात घ्या,” असेही संजय राऊत म्हणाले.

“हे शब्द देखील पाळतात, असं तुम्ही म्हणालात. देखील म्हणजे काय? जे शब्द पाळत नाही. त्यांना आम्ही घरी पाठवतो,” अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.  त्यावेळी राऊतांनी फडणवीसांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.  (Sanjay Raut Criticises Devendra Fadnavis)

संबंधित बातम्या :

मंत्री व्हायला अक्कल लागत नाही, रात्रंदिवस झोपलं तरी चालतं: सदाभाऊ खोत

पार्थ पवार पडला तेव्हा तुमची लायकी नव्हती का; गोपीचंद पडळकरांचा अजितदादांवर पलटवार

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडनेच स्थानिकांपर्यंत ऑडिओ क्लिप पोहोचवल्या