Sanjay Raut : रेस्टॉरंट, हॉटेल बस्स झालं, त्या ऐवजी तुकाराम मुंढेंना आता..संजय राऊतांची विचार करायला भाग पाडणारी मागणी

तुकाराम मुंढे यांची बदली आता मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाचे प्रमुख म्हणून करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांच्या मागणीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Sanjay Raut : रेस्टॉरंट, हॉटेल बस्स झालं, त्या ऐवजी तुकाराम मुंढेंना आता..संजय राऊतांची विचार करायला भाग पाडणारी मागणी
sanjay raut news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 12:16 PM

आयएसएस तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाचा कारभार हाती घेतला, त्या दिवसांपासून कारवाईचा धडाका लावला आहे. तुकाराम मुंढे यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक आस्थापना, रेस्टॉरंट, हॉटेलवर कारवाई केली आहे. देशभरात त्यांच्या कारवाईची चर्चा होत आहे. परंतु आता रेस्टॉरंट आणि हॉटेल बस झालं. लोकांना खाऊ द्या. खरंतर दुष्काळ, पुनर्वसन, महसूल , नगरविकास यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होत आहे. त्यासाठी या खात्याची कामे द्या. तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्र्‍यांच्या कार्यालयाचे मुख्य बनवावे, अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली.

संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आयएएस तुकाराम मुंढे यांच्यावर भाष्य करण्यासहित विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. निवडणूक आयोगावर संजय राऊत म्हणाले, ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना एक्स्पोज केल आहे. ते भाजपाला लाभ होईल, असं काम करत आहेत. ही स्वातंत्र्याची गळचेपी आहे. महाराष्ट्रामध्ये 2 कोटी नावे वगळलेली आहे. ही भूमिका घातक आहे. मुख्य आंदोलनाची सुरुवात मुंबईमधून होत आहे. दिपके यांनी जरी हाक दिली असली, तरी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली, ते 4 तारखेला स्वतंत्र मोर्चा काढणार आहे.. 2 तारखेला अभिजीत दिपके यांचा जो मोर्चा असेल, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे.
कोक्रोज जनता पार्टी राजकीय पक्ष नाही. ज्या राजकीय पक्षांना त्रास झाला आहे. त्या सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन आंदोलन केले.
4 ला होणारा मोर्चा मोठा मोर्चा असेल..

एसआयआर प्रक्रियेवर संजय राऊत म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी देखील या मुद्द्यावर चर्चा केली आहे. या सगळ्या संस्था, मोदी आणि अमित शहा यांच्या घरचे घरगडी आहे. हे दबावाखाली, प्रलोभनाच्या खाली आहेत. मोदी आणि शहा यांना जे हवंय, ते करण्यासाठी लोकशाहीची हत्या करत आहे. यातील मुख्य आरोपी ज्ञानेश कुमार आहेत. आम्ही कोर्टात गेलो, याचिका केली आहे, यातील निर्णय कोर्टाला घ्यावा लागेल. काँग्रेसने इंडिया आघाडी सोबत आम्ही आहोत हे लक्षात घ्यावं. दरवेळी काँग्रेसने वेगळी भूमिका मांडली नाही पाहिजे. ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचं महत्व आता पटत आहे. ही चांगली गोष्ट आहे. ही वेळ आहे दिल्लीच्या सैतानाला मारायची. यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. आम्ही राहुल गांधीचं केंद्रीय नेतृत्व मानतो. तर त्यांनी देखील विचार करावा’.

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावर राऊतांनी सरकावर टीका केली. ‘चंपत राय यांच्यामुळे तिजोरी लुटली गेली. हे भाजपचे लोक आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही आधीपासून सांगत आलो आहे. एसआयटीने चोरी झाल्याचे सांगितलं आहे. पण आमच्या मुख्यमंत्र्‍यांना दिसत नाही’. दुष्काळावर राऊत म्हणाले, ‘मागच्या 24 तासात 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, पण मदत काही पोहचली नाही. सगळे लोक वेगळे बोलत आहेत. हे मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे. 550 शेतकऱ्यानी आत्महत्या केली आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us