AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray : महाराष्ट्राचा दुष्काळ आणखी गंभीर होणार, आदित्य ठाकरेंकडून भीती व्यक्त, परभणीतून केली मोठी मागणी

महाराष्ट्राचा दुष्काळ आणखी गंभीर होणार असल्याची भीती आदित्य ठाकरेंकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर परभणीतून आदित्य ठाकरेंनी विद्यार्थ्यांसाठी मोठी मागणी केली.

Aaditya Thackeray : महाराष्ट्राचा दुष्काळ आणखी गंभीर होणार, आदित्य ठाकरेंकडून भीती व्यक्त, परभणीतून केली मोठी मागणी
Aaditya thackeray newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 11:52 AM
Share

फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळाची दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होणार असल्याची भीती आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली आहे. सरकारने विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ केलं आहे. परंतु त्याने काही होणार नाही. सरकारने विद्यार्थ्यांचं संपूर्ण वर्षांचं शैक्षणिक शुल्क माफ केलं पाहिजे, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. ते परभणीत बोलत होते.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल सोलापूरला भेट दिली. त्यानंतर आज रविवारी परभणीला पोहोचले. आदित्य ठाकरे हे परभणीच्या टाकळी कुंभकर्ण शिवारात दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही सोलापूरवरून दौरा सुरू केला होता. गंभीर परिस्थीती आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार आहे. मदत कधी मिळणार, हे स्पष्ट झालं पाहिजे. मागच्या वर्षीचं अतिवृष्टीची मदत, कर्जमाफीची मदत मिळाली नाही. ही मदत मिळालेली नाही. आम्हाला राजकारण करायचं नाही. मदत ही तातडीने मिळाली पाहिजे. काल एक शेतकऱ्याची आत्महत्या झाली. आज सकाळी देखील परभणीत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. शासनाकडून फक्त जीआर काढले जात आहेत. धीर देणं महत्वाची बाब आहे. त्यासाठी आम्ही सगळे फिरत आहोत. पण मदत तातडीची मिळाली पाहिजे. अन्यथा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो’.

‘सरकारमधील कोण मंत्री काय बोलतो, त्यांनी आधी थांबवलं पाहिजे. काल जीआर काढला. 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. केवळ 75 टक्के दुष्काळ जाहीर केला. शेतकऱ्यांना कोणतीही मदत आलेली नाही. मागच्या वर्षीची अतिवृष्टीची मदत, पॅकेज जाहीर झालं. 32 हजार कोटींचं पॅकेज गेलं कुठे, हा प्रश्न आहे. मागच्या वर्षी पूर आला होता. ते पाणी कुठे गेलं, कुठे जिरपलं. हे कोणाला कळलं नाही. कर्जमाफी जाहीर केली. काल एक-दोन गावात गेलो होतो. परंतु त्यांची नावे यादीत नाही. त्यांना मदत मिळाली नाही. तुम्ही वरतून सॅटेलाइट इमेजनरीमधून पाहत आहात. खाली पिके करपली आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

‘कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे. दुसरीकडे कर्जमाफी देखील जाहीर केली आहे, त्यावर ठाकरे म्हणाले, सरकारचा गोंधळ उडाला आहे. शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्जवसुलीच्या नोटीस पाठवल्या आहेत. त्या लगेच थांबवल्या पाहिजे. जुनं जीआर पुन्हा काढल्या सारखे आहे. परीक्षा शुल्क माफ केलं आहे. परंतु ते करून काय होणार आहे. तुम्ही संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ केलं पाहिजे. अनेक लहान मुले भेटली, त्यांनी मदत मागितली, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Follow Us
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप