AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Thackeray: दिशा सालियनप्रकरणी CBI चौकशीच्या आदेशानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

Aaditya Thackeray: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या..

Aditya Thackeray: दिशा सालियनप्रकरणी CBI चौकशीच्या आदेशानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
दिशा सालियान, आदित्य ठाकरेImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 04, 2026 | 8:36 AM
Share

Disha Salian Case: दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचं प्रकरण तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBIला दिल्यानंतर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाशी नाव जोडलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. CBI चौकशीच्या आदेशानंतर आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.

“या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही”, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. त्यांनी हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी या आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही केला. गेल्या काही वर्षांपासून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे CBI चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रतिक्रियेकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे.

उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

दिशा सालियन यांच्या वडिलांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तपासात काही गंभीर बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणातील तपासाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत नव्याने चौकशीची गरज असल्याचं स्पष्ट केलं. न्यायालयाने CBIला FIR दाखल करून प्रकरणाचा सविस्तर तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच मुंबई पोलिसांकडील संबंधित कागदपत्रं आणि तपासाशी संबंधित माहिती CBIकडे देण्याचे निर्देश आहेत. मात्र, तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला आरोपी ठरवू नये, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

दिशा सालियन प्रकरण नेमकं काय आहे?

दिशा सालियन ही काही काळ अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम करत होती. 8 जून 2020 रोजी मुंबईतील एका इमारतीवरून पडून तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाला आणि त्यामुळे दोन्ही प्रकरणांमध्ये संबंध असल्याच्या विविध चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर CBI या प्रकरणाचा नव्याने तपास करणार आहे. या तपासातून दिशाच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि आतापर्यंत अनुत्तरित राहिलेले प्रश्न स्पष्ट होतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी