Ajit Pawar Death In Plane Crash : महाराष्ट्राला आणखी काय पहावं लागेल हे..अजित पवारांच्या निधनावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

"शरद पवारांसोबत बैठका व्हायच्या तेव्हा अजित पवार सोबत असायचे. अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतली तेव्हा आदल्यादिवशी रात्री 11 पर्यंत एकत्र होतो. त्यानंतर शोधाशोध करताना ज्या घडामोडी घडल्या त्या रंजक होत्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये अजित पवार यांची सोबत महत्वाची होती"

Ajit Pawar Death In Plane Crash : महाराष्ट्राला आणखी काय पहावं लागेल हे..अजित पवारांच्या निधनावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut-Ajit Pawar
| Updated on: Jan 28, 2026 | 12:38 PM

“अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी आली, त्यावेळी प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये. अजित पवार सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावेत. पण ही धक्कादायक,बातमी कानावर आली. अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राच राजकारण, समाजकरण हे बेचव आणि अळणी होईल. त्यांचं व्यक्तीमत्व दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणार नेता होता” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या निधनावर दिली आहे. “त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनवरची पकड या गोष्टी सैदव महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांच एक नातं होतं. त्याच बारामतीत त्यांचा मृत्यू यावा हा विचित्र योगायोग आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“श्रद्धांजली त्यांना वहावी लागेल असी कधी मनात आलं नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीच राजकारण केलं. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कॅबिनेटला येताना पूर्ण तयारी करुन येणारे ते मंत्री होते. राज्याच्या प्रश्नांचा अभ्यास, त्यांना विशेष पाटबंधारे, पाणी या संदर्भात त्यांचा अभ्यास पक्का होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केलं. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं. गेल्या अडीचवर्षात शरद पवारांशिवाय राजकारण त्यांनी सुरु केलं. त्यांचा असा अकाली अंत होईल अस कोणाच्याही ध्यनीमनी नव्हतं” असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राचे काय ग्रह फिरलेत माहित नाही

“अत्यंत कार्यक्षम मंत्री असा त्यांचा लौकीक होता. त्यांनी त्यांना मिळालेले प्रत्येक पद राजकारणासाठी, कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी विकासासाठी वापरलं. त्यांच्या बोलण्यात कधी राग, चीड आली तरी पटकन विनोदी वाक्य टाकून सर्व वातावरण हसरं, खेळत ठेवायची त्यांची कसब होती. आज खरच महाराष्ट्राच दु:ख आहे. महाराष्ट्राचे काय ग्रह फिरलेत माहित नाही, अनेक प्रमुख नेते आपल्यापासून हिरावून गेलेत. विलासराव देशमुख,गोपीनाथराव मुंडे अगदी उमद्या वयात गेले आणि आता अजित पवार” असं संजय राऊत म्हणाले.

उत्तम, कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला असता

“विक्रमी संख्येने ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाले असते, तर महाराष्ट्राला उत्तम, कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला असता. पण दुर्देवाने असं होऊ शकलं नाही. महाराष्ट्राला आणखी काय पहावं लागेल हे सांगता येत नाही. मी शिवसेना परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो” असं संजय राऊत म्हणाले.